जिल्ह्यात आढळले आजपर्यंत १०२१ कोरोना बाधीत, तर ६७५ झाले कोरोनामुक्त आज आढळले २३ बाधीत.
कारंजा:(प्रतिनिधी) दि १२ ऑगस्ट
जिल्हामाहिती कार्यालयाच्या प्राप्त माहिती नुसार आज जिल्ह्या भरात २३ बाधीत रुग्ण आढळले आहेत ज्या मध्ये सकाळी
मंगरूळपीर शहरातील बिरबलनाथ मंदिर परिसरातील २, शेगी येथील ५ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
तर संध्याकाळी ४७ कोरोना ग्रस्तानी कोरोना वर मात केल्याने त्यांना घरी सोडले आहे
वाशिम शहरातील ड्रीमलँड सिटी परिसरातील २, अल्लाडा प्लॉट ३, टिळक चौक २, गवळीपुरा ३, सोंडा येथील १, अनसिंग येथील १६, मंगरूळपीर शहरातील शिवाजी नगर परिसरातील १, सिद्धार्थ विद्यालय परिसरातील १, कवठळ येथील ४, शेलूबाजार येथील ४, शेंदूरजना मोरे येथील १, रिसोड शहरातील पठाणपुरा येथील २, हराळ येथील ३, कारंजा_लाड येथील सिंधी कॅम्प येथील २, दिल्ली वेस परिसरातील १, शिक्षक कॉलनी परिसरातील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला.
दरम्यान, कारंजा शहरातील माळीपुरा येथील १, हयातनगर येथील १, सोहळ येथील १, कामरगाव येथील १ रैपिड टेस्ट मध्ये बाधीत आढळले असून मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १, शिरसाळा येथील ८, रिसोड तालुक्यातील गोहगाव येथील १, एकलासपूर येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह –१०२१
ऍक्टिव्ह – ३२७
डिस्चार्ज – ६७५
मृत्यू – १८ (+१)
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)