कारंजेकराची पिण्याची पाण्याची चिंता मिटली ,धरणाची पातळी वाढल्याने प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले

कारंजेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली धरणा ची पातळी वाढल्याने  प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले


(प्रकल्पातून 96 क्युबिक मीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग, प्रकल्पात 78.31 टक्के पाणीसाठा)


कारंजा-(कारंजा वृत्तकेसरी)


   कारंजा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अडाण प्रकल्पात आतापर्यंत 78.31 टक्के पाणीसाठा जमा झाला असून, प्रकल्पातील 96 क्युबिक मिटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग अडाण नदीपात्रात केल्या जात आहे. यासाठी प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडले असून त्यातील 3 दरवाजे 20 से.मी ने तर दोन दरवाजे 10 से.मी ने उघडण्यात आले असल्याची माहिती अभियंता जिरवनकर यांनी दिली.      


               मागील वर्षी याच काळात अडाण प्रकल्पात केवळ 7 टक्के पाणीसाठा हेाता. यंदा मात्र यात जवळपास 70 टक्क्याची वाढ झाल्याने कारंजेकरांची पाणीटंचाईची समस्या मिटली आहे. कारंजा शहराला पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने अडाण प्रकल्पातून कारंजा शहरापर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली. परंतु मागील काही वर्षांत दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने या प्रकल्पात पावसाळ्यातही फारसा पाणीसाठा जमा झाला नव्हता. याचे परिणाम कारंजेकरांना पाणीटंचाईच्या माध्यमातून भोगावे लागले. परंतु यंदा मात्र जून महिन्यापासून पावसाला सुरूवात झाली असून सध्यपरिस्थितीतही कांरजा तालुक्यासह अडाण प्रकल्प परिसरात समाधानकारक पाऊस पडत असल्याने या प्रकल्पात मागील वर्षीपेक्षा जवळपास 70 टक्के अधिकचा पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग अडाण नदीपात्रात करण्यात येत असून पाण्याचा विसर्ग करणे थांबविले तर येत्या काही दिवसात सदर प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा होण्याची शक्यता आहे. यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस मान असल्याने सदर प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून कारंजेकरांची पाणीटंचाईची चिंता मिटली आहे.