भाजपाची जंबो जिल्ह्या कार्यकारिणी व विविध आघाड्या व मोर्चाचे अध्यक्ष घोषीत : जिल्हाध्यक्ष आ.पाटणी यांनी केली घोषणा

भाजपाची जिल्हा कार्यकारिणी व विविध आघाड्या व मोर्चाचे अध्यक्ष घोषीत : जिल्हाध्यक्ष आ.पाटणी यांनी केली घोषणा


 वाशिम : ( संदीप क़ुर्हे)


      भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी यांनी (दि.17) रोजी पक्षाची जिल्हा कार्यकारिणी घोषीत केली. यामध्ये सात उपाध्यक्ष, संघटन सरचिटणीस, सात चिटणिस, कोषाध्यक्ष, तिन संपर्क प्रमुख, विविध आघाड्या, मोर्चे व सेलचे अध्यक्ष, संयोजक तथा कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे. तर,जिल्हा महामंत्र्यांची घोषणा अगोदरच केलेली होती.


भारतीय जनता पार्टीच्या संघटन बांधणीचा कार्यक्रम देशभर सुरू आहे. श्री जगतप्रकाश नड्डा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर संघटन बांधणीच्या कार्यक्रमाने गती घेतली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आमदार चंद्रकांतदादा पाटील यांची फेरनिवड झाल्यानंतर गत महिन्यातच प्रदेशाची कार्यकारिणी जाहीर झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच वाशिमच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार राजेंद्र पाटणी यांची सर्वानुमते निवड झाली होती. तेव्हापासून जिल्ह्याच्या कार्यकारिणीकडे लक्ष लागून होते. दरम्यान जिल्हाध्यक्ष आ. पाटणी यांनी जिल्ह्याचे महामंत्री सात मंडळांचे अध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली होती. तर उर्वरित कार्यकारिणी घोषीत केली. यामध्ये उपाध्यक्षपदी श्री. धनंजय हेंद्रे, सौ. रूख्मिनीताई रणखांब,अनिल कानकिरड, जयकिसन राठोड, विजय अनंतकुमार पाटील, खुशाल ढोणे, सौ. मंदाताई रविंद्र चव्हाण यांची वर्णी लागली आहे. संघटन सरचिटणीस म्हणून सुनिल राजे. जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनिल काळे, श्याम बढे यांचा समावेश आहे. चिटणीस कोषाध्यक्ष मिठूलाल शर्मा, जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून संदीप पिंपरकर, धनंजय रणखांब व संदीप गढवाले यांची नियुक्ती करण्यात आली. चिटणीस म्हणून जितेंद्र महाराज, चंद्रमणी इंगोले, संतोष शिंदे, शरद चव्हाण, श्रीमती करूणाताई कल्ले, नितीन काळे, अभिषेक दंडे यांची निवड करण्यात आली. कार्यसमिती सदस्यांमध्ये संजय देशमुख, संतोष तिखे, नंदाताई खंडागळे, सौ. पल्लवी बळी, डॉ. राजु मुंदडा, अरूण घुगे, शंकरराव बोरकर, शंकरराव रेखे, सौ. छायाताई पाटील, अशोक सानप, नामेदव हुंबाळ, गजानन भाग्यवंत, गजानन गोटे, सौ. रत्नकला नप्ते, वामनराव अंभोरे, उल्हास राठोड, मोहन गांंजरे, बाबाराव महाले, ज्ञानेश्वर वानखेडे, भानुप्रतापसिंह ठाकुर, भिमकुमार जिवणानी, रूपेश वाघमारे, गौतम सोनोने, रेखाताई शर्मा, डॉ.संजय राऊत, उपेंद्र आव्हाळे, गोपाल पाटील लुंगे, विलास पवार, सौ. लता भगत, प्रा. विरेंद्रसिंह ठाकुर, डॉ. दिलीप रत्नपारखी, गणेश परांडे, सौ. रूपाली खोडे,सौ. कविता बाहेती, सुरेश दवंडे, रवि शहाकार, दुर्गाताई घोडे, सुनिताताई नाखले, पुंडलिक झोंबाडे, दिगांबर घाडगे, विजय बगडे, शरद कजहे, संदीप बानोरे, बाबूलाल साबळे, प्रसन्ना साकरकर, उमेश ठाकरे, स्वातीताई पाटील, विनादेवी जयस्वाल, प्रकाश जाधव, महेश राऊत, मिलिंद देशमुख, डॉ, ओंकार राठोड, डॉ, जयश्री गुट्टे, डॉ. सरोज बाहेती, डॉ, वैशाली चौधरी, कल्पनाताई खामकर, आदींची नियुक्ती केली आहे.


आमदार लखन मलिक, माजी आमदार विजयराव जाधव, पुरूषोत्तम राजगुरू, सुरेश लुंगे, नरेंद्र गोलेच्छा, राजु पाटील राजे, सुधाकरराव परळकर, डॉ. विवेक माने, भाष्करराव रंगभाळ, लताताई उलेमाले, पुरूषोत्तम चितलांगे, बंडु पाटील महाले, सुभाष नानवटे, रमेश लाहे, मारोतराव लादे, गोपाल पाटील राऊत, डॉ. हरिष बाहेती, डॉ. प्रविण ठाकरे, सुरेश लोध आदी जिल्हा कार्यसमितीमध्ये विशेष, कायम निमंत्रित सदस्य असतील.


विविध आघाड्या व मोर्चाचे अध्यक्ष जाहीर


भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार पाटणी यांनी विविध आघाड्या, मोर्चे, सेल व प्रकोष्ठांचे अध्यक्ष व संयोजकांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी विजय काळे, महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी सौ. मिनाताई ज्ञानेश्वर काळे, अनुसुचित जाती मोर्चाच्या अध्यक्षपदी प्रा. संजय खिराडे, अनुसुचित जमाती मोर्चाच्या अध्यक्षपदी देवानंद होलगरे, अल्पसंख्यांक मोर्चाच्या अध्यक्षपदी मो. इमदाद भाई, किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी निळकंळ पाटील इंगोले, व्यापारी आघाडीच्या संयोजकपदी सुनिल मालपाणी, उद्योग सेलच्या संयोजकपदी मनिष मंत्री, भटक्या विमुक्त आघाडीच्या अध्यक्षपदी विरेद्र मधुकर पवार, वैद्यकीय सेलच्या संयोजकपदी डॉ. योगेश नानवटे, कायदा सेलच्या संयोजकपदी अ‍ॅड. राजेश विश्वकर्मा, जेष्ठ कार्यकर्ता सेलच्या संयोजकपदी प्रमोद गंडागुळे, भारत भारत अभियान सेलच्या संयोजकपदी कपिल सारडा, शिक्षक सेलच्या संयोजकपदी महेश उगले, सोशल मिडीया सेलच्या संयोजकपदी नविन शर्मा, माजी सैनिक सेलच्या संयोजकपदी मोहन गोरे, जिल्हा प्रशिक्षण सेलच्या संयोजकपदी जयंत वसमतकर, इंजिनिअर सेलच्या संयोजकपदी मिलिंद भावसार, उत्तर भारतीय सेलच्या संयोजकपदी ललित तिवारी, दिव्यांग सेलच्या संयोजकपदी अनिल कुळकर्णी, सांस्कृतिक सेलच्या संयोजकपदी डॉ. सुशिल देशपांडे, क्रिडा सेलच्या संयोजकपदी राजेश अढाव आदींची नियुक्ती करण्यात आली आहे