आज दिवसभरात ६७ रुग्णाची वाढ तर २३ रुग्णाची कोरोना वर मात कारंजा उपजिल्हा रुग्णालयात घेत आहेत ५५ कोरोना बाधीत उपचार

आज दिवसभरात ६७ रुग्णाची वाढ तर २३ रुग्णाची कोरोना वर मात  


     कारंजा उपजिल्हा रुग्णालयात घेत आहेत ५५ कोरोना बाधीत उपचार


 कारंजा:(संदीप क़ुर्हे)दि १३ 


    जिल्ह्या माहिती कार्यालय च्या माहिती नुसार आज दुपारच्या अहवालात वाशिम शहरातील ड्रीमलँड सिटी परिसरातील ३, काटीवेस परिसरातील ७, अनसिंग येथील १, साखरा येथील ३, पार्डी आसरा येथील १, रिसोड शहरातील जिजाऊ नगर येथील १, देशमुख गल्ली येथील १, एकलासपूर येथील १, गोहगाव येथील २ , मालेगाव तालुक्यातील शिरसाळा येथील ३, मुठ्ठा येथील २, शिरपूर जैन येथील ३ असे एकूण २८ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


           आणखी ३९ कोरोना बाधित


वाशिम शहरातील शिवप्रताप नगर येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील ७, शिरसाळा येथील २१, मंगरूळपीर येथील पोस्ट ऑफिस रोड परिसरातील १, शेगी येथील १, कारंजा लाड शहरातील भारतीपुरा येथील १, गायत्री मंदिर परिसरातील ५, किन्ही रोड बायपास परिसरातील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


       २३ रुग्णाची कोरोना वर मात


मंगरूळपीर शहरातील तहसील कार्यालय परिसरातील २, शेलूबाजार येथील १०, कारंजा लाड शहरातील विश्वभारती कॉलनी येथील १, मजीदपुरा येथील १, लोकमान्य नगर येथील १, हातोतीपुरा येथील १, पोलीस स्टेशन जवळील १, भारतीपुरा येथील १, पोहा येथील २, कामरगाव येथील १, वाशिम शहरातील खतीबपुरा येथील १, इलखी येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला.


 दरम्यान, अमरावती येथे उपचार घेत असलेल्या कारंजा लाड शहरातील ७० वर्षीय व्यक्तीचा ६ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला असून त्याची नोंद आज घेण्यात येत आहे.


 दरम्यान कारंजा येथे तुळजा भवानी कोरंटाईन सेंटर मध्ये १२ ऑगस्ट व १३ ऑगस्ट रोजी एकूण २३६ +६५ अशा रैपिड टेस्ट घेण्यात आल्या होत्या त्या पुढेहि आणखी २ दिवस घेणार असल्याची माहिती आहे 


    आज रोजी कारंजा उपजिल्हा रुग्णालयाच्या कोव्हीड केअर सेंटर मध्ये ५५ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ भाऊसाहेब लहाने यांनी दिली आहे


 


एकूण पॉझिटिव्ह –१०८८


ऍक्टिव्ह – ३७०


डिस्चार्ज – ६९८


मृत्यू – १९ (+१)


 


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)