वाशिम जिल्ह्यात आज २० रुग्णाची नोंद तर ११ रुग्ण कोरोना मुक्त

 वाशिम जिल्ह्यात आज २० रुग्णाची नोंद तर ११ रुग्ण कोरोना मुक्त


कारंजा: (संदीप क़ुर्हे)२० ऑगस्ट


    जिल्ह्या माहिती कार्यालय कडून प्राप्त अहवालात आज जिल्ह्यात आज २० कोरोना रुग्णाची नोंद झालेली आहे ज्यामध्ये वाशिम शहरातील बाकलीवाल कॉलनी परिसरातील १, मानोरा तालुक्यातील चिखली येथील ४, आसोला येथील ३, सोमनाथनगर येथील २, रिसोड शहरातील आसनगल्ली येथील १, भरजहांगीर, १ कारंजा लाड शहरातील सुदर्शन कॉलनी परिसरातील २, साळीपुरा येथील २, रंगारीपुरा येथील २, भिलखेड येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.  


 


११ व्यक्तींना केले आज डिस्चार्ज


      


वाशिम शहरातील सुदर्शन नगर येथील २, काटीवेस येथील १, पांडव उमरा येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १, मुठ्ठा येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील शेगी येथील १, रिसोड तालुक्यातील गोहगाव हाडे येथील २, मानोरा तालुक्यातील बुंदी येथील १, कारंजा लाड तालुक्यातील आखातवाडा येथील १ व्यक्तीला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.


दरम्यान, १६ ऑगस्ट रोजी कोरोना बाधित आढळलेल्या वाशिम तालुक्यातील वारा जहांगीर येथील ६० वर्षीय महिलेचा काल, १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी, तर ७ ऑगस्ट रोजी कोरोना बाधित आढळलेल्या कारंजा लाड तालुक्यातील सोहळ येथील ४० वर्षीय व्यक्तीचा आज पहाटे २ वा. दरम्यान उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.


   जिल्ह्याबाहेर २४ कोरोना बाधित


    गेल्या काही दिवसांत वाशिम जिल्ह्यातील २४ व्यक्ती जिल्ह्याबाहेर कोरोना बाधित आढळल्या आहेत. त्यापैकी ११ व्यक्तींना डिस्चार्ज मिळाला असून १३ व्यक्ती उपचार घेत आहेत. त्यांचा समावेश जिल्ह्याच्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीत करून जिल्ह्याची आकडेवारी अद्ययावत करण्यात आली आहे. 


     कोरोना बाधितांची सद्यस्थिती


    एकूण पॉझिटिव्ह –१३१७


    ऍक्टिव्ह – ३८५


    डिस्चार्ज – ९०९


    मृत्यू – २२ (+१) 


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)