कि न महाविद्यालय कारंजा च्या विकास समिती वर सामाजिक कार्यकर्ते आशिष तांबोळकर व अॅड जुनेद खान यांची सद्यस्य म्हणून निवड

कि न महाविद्यालय कारंजा च्या विकास समिती वर सामाजिक कार्यकर्ते आशिष तांबोळकर व अॅड जुनेद खान यांची सद्यस्य म्हणून निवड


कारंजा:(कारंजा वृत्तकेसरी)


  शहरातील नामांकित सामाजिक कार्यकर्ते तथा सर्वाना परिचीत पांजरापोळ संस्थान चे संचालक,विदर्भ सहित्या संघाचे सचिव आशिष तांबोळकर व न्यायिक विभागात प्रसिद्ध असणारे विधीज्ञ ॲड.जुनेद खान यांची दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी अकोला अंतर्गत संचालित कि. न.महाविद्यालय कारंजा च्या महाविद्यालय विकास समिति च्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली.


            या प्रसंगी कि.न.महाविद्यालय येथे दि. बेरार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. श्री.मोतीसिंह जी मोहता, सचिव श्री. पवनजी माहेश्वरी, कारंजा येथील प्रसिद्ध डॉ. व व्यवस्थापन समिति सदस्य श्री.अजय कांत, श्री. बंसिधर जी उपाध्याय सदस्य, प्राचार्य श्री .विनय कोडापे, श्री.संजय घड्याळजी व्यवस्थापकीय प्रमुख, इतर सर्व कर्मचारिवृन्द हजर होते.याबद्दल सर्वांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. व या नियुक्ती बद्दल दोघांनी सगळ्याचे आभार मानले.