आदिशक्ती पुरस्काराची मानकरी ठरली यावार्डी ची रानी ठाकरे

यावर्डीच्या राणी ठाकरे ला आदिशक्ति पुरस्काराचे वितरण


कारंजा:-(संदीप क़ुर्हे) 


    कारजा येथून जवळच असलेल्या ग्राम यावर्डी येेथिल बाबासाहेब धाबेकर विद्यालयात दिनांक 21 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 9:30 वाजता विद्यालयाच्या प्रांगणात कु.राणी संतोष ठाकरे हिला आदिशक्ति पुरस्काराचे वितरण शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांचे हस्ते वितरित करण्यात आले. 


       आदिशक्ति महिला बहुउद्देशीय सस्था वाल्हाई ता.कारंजा तर्फे गेल्या पाच वर्षापासून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत शाळेतून प्रथम आलेल्या मुलीला या पुरस्काराचे वितरण करण्यात येत आहे.त्यान्तर्गत बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावार्डिची विद्यार्थिनी कु.राणी संतोष ठाकरे हीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत 92.40% गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवल्या मुळे तिला आदिशक्ति पुरस्कार देण्यात आला.त्यामधे रु.2000/- चा धनादेश, प्रमानपत्र व सन्मानचिन्ह समावेश होता.


         यावेळी संस्थेचे संचालक डी.पी. काळबांडे,व शाळेचे सर्व शिक्षकेत्तर कर्म. उपस्थित होते.