अमरावती येथून किसान रेल सुरु करण्याची पश्चिम विदर्भ विकास परिषद ची मागणी अमरावती येथून किसान रेल सुरु केल्यास वैदर्भीय शेतकऱ्यांना आपला माल देशान्तर्गत कुठेही विकता येणार--- दिनेशजी सूर्यवंशी,नितिनजी भूतड़ा

 अमरावती येथून किसान रेल सुरु करण्याची पश्चिम विदर्भ विकास परिषद ची मागणी


       अमरावती येथून किसान रेल सुरु केल्यास वैदर्भीय शेतकऱ्यांना आपला माल देशान्तर्गत कुठेही विकता येणार--- दिनेशजी सूर्यवंशी,नितिनजी भूतड़ा


कारंजा:(संदीप क़ुर्हे )


    शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव ,मोबदला मिळावा,त्यांचे उत्पन्न वाढावे या करिता शेती मालाला पूर्ण भारतभर बाजारपेठ उपलब्ध व्हावी या करिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मागील अर्थसंकल्पात घोषणा केल्या प्रमाणे भारतीय रेल विभागाने महाराष्ट्रातील देवळाली ते दानापुर(बिहार) दरम्यान फक्त शेतकी मालाची वाहतूक करण्या करीता किसान रेल सेवा सुरु केली आहे .


   याच धरतीवर हीच किसान रेल सेवा विदर्भातील अमरावती येथून सुरु करण्याच्या नितीन गडकरी यांच्या संकल्पेतुन पश्चिम विदर्भ विकास परिषद ची स्थापना करण्यात आली त्या अनुसंघाने दी २८ ऑगस्ट रोजी पंजाबराव देशमुख कृषी विद्यपिठ च्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकी मध्ये अमरावती विभागातमोठया प्रमाणात संत्र, केळी, सीताफल,खान्याचेगोडपान,हळद,मिर्ची,भजिपाला, मासोळी उत्पादन,जड़ी बूटी,वनसंपदा, चिखलदरा ची स्ट्राबरी बाकी सर्वच उत्पादन चांगल्या प्रमानात असल्याने ही किसान रेल अमरावती येथून सुरु करण्यासाठी पंतप्रधान व रेल मंत्रालय ला पाठपुरावा करण्यासाठी ह्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


    ही रेल्वे पश्चिम विदर्भातुन सुरु केल्यास विदर्भात नवीन उद्योगाला चालना मिळून रोजगार वाढनार असून परिणामी अर्थव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे सदर बैठकी मध्ये समितीचे अध्यक्ष दिनेशजी सूर्यवंशी, अमरावती,संयोजक नितीनजी भुतडा यवतमाळ,आशिषजी तांबोळकर कारंजा,श्रीमती मीरा फडणीस यवतमाळ,प्रशांत जोशी ,स्वानंद कोंडोलिकर,जयश्री फुंडकर नगराध्यक्ष तेल्हारा,प्रवीण देशपांडे पातूर,उत्पल टागो ,डॉ राजीव काळे कारंजा व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते प्रास्ताविक श्रीमती मीरा फडणीस यांनी केले तर संचलन आशिष तांबोळकर यानी केले


नितीन भुतडा व दिनेश सूर्यवंशी यांनी विदर्भ विकास परिषद स्थापन करण्या मागील भूमिका स्पष्ट केली व पश्चिम विदर्भ तील तरुणांना रोजगार निर्माण कसा करायचा त्यातील अडचणी कश्या पद्धतीने सोडवाच्या याबाबत सर्व ५६ तालुक्यात काम करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे सांगितले, व प्रत्येक तालुक्यात किमान एक तरी कृषी उत्पादन कंपनी सुरु करण्याचे ठरविले