आज दिवसभरात जिल्ह्यात वाढले ४१ रुग्ण पैकी कारंजा शहरात वाढले २७ रुग्ण २६ रुग्णाची कोरोनावर मात

कारंजा शहर बनतोय कोरोना हॉटस्पॉट,उपजिल्हा रुग्णालया चा वाढतोय ताण प्रशासनावर वाढला ताण


 आज दिवसभरात जिल्ह्यात वाढले ४१ रुग्ण पैकी कारंजा शहरात वाढले २७ रुग्ण


२६ रुग्णाची कोरोनावर मात


 कारंजा : (कारंजा वृत्तकेसरी) दि २ ऑगस्ट


     जिल्ह्या प्रशासना च्या माहिती नुसार काल रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील आणखी ३४ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. यामध्ये कारंजा शहरातील दामिनी नगर परिसरातील ४, तुषार नगर परिसरातील १, पोलीस स्टेशन परिसरातील ६, वाणीपुरा परिसरातील १०, भारतीपुरा परिसरातील २, उंबर्डा बाजार येथील १, मंगरुळपीर शहरातील शिंदे कॉलनी परिसरातील १, पठाणपुरा परिसरातील १, शशिमोहन टॉकीज परिसरातील १ आणि चिखली येथील ४, रिसोड शहरातील गणेश नगर येथील १, वाशिम तालुक्यातील अनसिंग येथील १ व्यक्तीचा समावेश आहे. तसेच काल, १ ऑगस्ट रोजी सकाळी वाशिम कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या कारंजा लाड शहरातील माळीपुरा परिसरातील ६५ वर्षीय महिलेचाही कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर संध्याकाळी ७ वाजताच्या प्राप्त अहवालानुसार ७ व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहेत


यामध्ये कारंजा लाड शहरातील इंदिरा नगर परिसरातील १, सिंधी कॅम्प परिसरातील १, एम. बी. आश्रम परिसरातील १, दिल्ली वेस परिसरातील १ आणि वढवी येथील १, मंगरुळपीर शहरातील शिवाजी नगर येथील १, शेलुबाजार येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.


जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २६ रुग्ण बरे झाले मुळे आज त्याना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये कारंजा लाड शहरातील इंगोले प्लॉट परिसरातील ५, वाशिम शहरातील सिव्हिल लाईन्स येथील १, विनायक नगर येथील १, जानकी नगर येथील ४, लाखाळा येथील ३, शुक्रवार पेठ येथील १, कळंबा महाली येथील ६, मंगरूळपीर शहरातील ताजीपुरा येथील १, तालुक्यातील नांदगाव येथील १, शेलुबाजार येथील १, आसेगाव येथील १, मानोरा तालुक्यातील राहूल पार्क, सोमठाणा येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.


      दरम्यान जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता प्रशासनाचा ताण वाढला असून फक्त कारंजा शहरात एका दिवसात २७ रुग्ण निघाले आहेत परिणामी कोरोना रोखण्या करिता महसूल प्रशासन,उपजिल्हा रुग्नलयाचे वैद्यकीय अधिक्षक सह आरोग्य कर्मचारी,नगर पालिका प्रशासना वर ताण वाढत असल्याचे दिसत आहेत उपजिल्हा रुग्णालय प्रशासना वर वाढती रुग्ण संख्या पाहता रुग्णाची ग़ैरसोय होउ नये याकरिता प्रयत्नशील आहे