कोरोना वर मात करुण कोरोना शी लढाई करण्यास पोलिस कर्मचारी योद्धा पुन्हा नागरिकांच्या रक्षणार्थ मैदानात

 कोरोना वर मात करुण  कोरोनापासुन नागरिकांच्या बचावा करिता  पुन्हा कोरोनाशी लढन्या करीता पोलिस विभागातील कोरोना योद्धा सज्ज    


थानेदारा सह कर्मचार्याणी केले स्वागत


 कारंजा (संदीप क़ुर्हे)४ ऑगस्ट 


कोरोनाला हरवून पुन्हा कर्तव्यावर रुजू होणार्‍या पोलिस विभागातील कोरोना योद्धांचा ठाणेदारांनी गुलाब पुष्प देऊन सन्मान केला व पुन्हा कर्तव्यावर रूजू झाल्याबद्दल पाठीवर शाबासकीची थापही दिली. 


 कारंजा शहर पोलिस स्टेशनचे काही कर्मचार्‍यांना काही दिवसांपूर्वी कर्तव्य बजावत असतांना कोरोनाची लागण लागली होती. त्यामुळे कोरोना योद्धांनाच कोरोना झाल्यामुळे कारंजा शहरातील नागरिकही थोडेसे धास्तावले होते. मात्र यशस्वी उपचार नंतर कोरोनाला मात देत हे पोलिस कोरोना योद्धा पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू होण्यास सज्ज झाले. 


 आज ड्युटीवर रूजू होत असतांना कारंजा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील यांनी या कर्मचार्‍यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान केला तसेच रोगावर मात करीत कर्तव्यावर रूजू होत असतांना पाठीवर शाबासकीची थापही दिली. यामुळे कर्मचार्‍यांचा आत्मविश्‍वास व कर्तव्य बजावण्याची, जनसेवा करण्याची उर्मी निश्‍चितच बळावली.