आजच्या अहवालात जिल्ह्यात आणखी ३१ कोरोना बाधित तर ५८ कोरोनामुक्त

आजच्या अहवालात जिल्ह्यात आणखी ३१ कोरोना बाधित तर ५८ कोरोनामुक्त


कारंजा: (संदीप क़ुर्हे)


जिल्ह्यात आज आलेल्या कोरोना अहवालात ३१ बाधितांची तर ५८ कोरोनामुक्त रुग्ण ची नोंद झाली आहे 


      काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील गव्हाणकर नगर परिसरातील १, गुरुवार बाजार परिसरातील १, परळकर हॉस्पिटल परिसरातील ३, दंडे चौक परिसरातील १, तिरुपती सिटी परिसरातील १, सिव्हील लाईन्स परिसरातील ३, काटा येथील १, इलखी येथील २, अनसिंग येथील २, फालेगाव कोरडे येथील १, मालेगाव शहरातील दुर्गा चौक येथील १, वार्ड क्र. सहा येथील ४, पांगरीकुटे येथील १, शिरपूर जैन येथील ३, मुंगळा येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील २, नागी येथील १, कवठळ येथील १ व कारंजा लाड येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.


         ५८ व्यक्तींना डिस्चार्ज


     वाशिम शहरातील इंगोले नगर परिसरातील १, जुने बाहेती हॉस्पिटल परिसरातील १, चामुंडादेवी परिसरातील ५, लाखाळा परिसरातील ८, कोल्हटकरवाडी परिसरातील ३, गुरुवार बाजार परिसरातील १, वारा जहांगीर परिसरातील ६, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, साळीपुरा येथील १, रंगारीपुरा येथील ३, वाणीपुरा येथील १, शिवाजी नगर येथील १, महावीर नगर येथील १, मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द येथील २, मंगरूळपीर तालुक्यातील लाठी येथील १, शेलूबाजार येथील २, रिसोड तालुक्यातील सवड येथील १, धोडप बोडखे येथील ४, येवती येथील १, मालेगाव शहरातील मेन रोड परिसरातील १, दुधाळा येथील ४, शिरपूर जैन येथील ८ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


  


कोरोना बाधितांची सद्यस्थिती


 


एकूण पॉझिटिव्ह –१७५३


ऍक्टिव्ह – ४०९


डिस्चार्ज – १३१३


मृत्यू – ३० (+१) 


 


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)