अयोध्येतील राममंदीर बांधकाम शुभारंभ प्रसंगी पंढरपुरातील शांतीनाथ महाराज मठात आनंदोत्सव साजरा
पंढरपुर:(कारंजा वृत्तकेसरी)
अयोध्या येथे राममंदिर बांधकाम शुभारंभ करण्यात आला ते दिवस सिद्धसदगुरु शांतीनाथ महाराज यांचे करीता अत्यानंदी झाला. या दिवसी गुरू आदित्य वैष्णव योगपीठ तीर्थ क्षेत्र पंढरपुर आश्रम येथे सर्व हिंदु धर्मीयांचे हृदयस्थान असलेले प्रभु रामचंद्र यांचे जन्मभूमी अयोध्या येथे मंदीर निर्माण कार्याचा शुभारंभ होत असतांना पंढरपुर येथील महाराजांचे उपरोक्त आश्रमात दुपारी 12 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रामनामाचा अखंड जयघोष व घंटानाद करण्यात आला .सिद्ध सदगुरु शांतीनाथ महाराज यांनी व भक्तांनी हा आनंदोत्सव त्यांचे मठात अखंड जयघोषाने साजरा केला त्यावेळी जयघोष नाद व घंटा नादाच्या लहरींनी शांतीनाथ महाराजसह सर्व भक्त तल्लीन झालेत. सिद्ध सदगुरु शांतीनाथ महाराज यांना दुर्दम्य आत्मविश्वास होता की, अयोध्येत प्रभू श्रीरामाचा जन्म झाल्याने ,हे स्थळ जन्म स्थळ असल्याने येथे रामाचाच हक्क असल्याने येथे हक्काचे आपल्या प्रभु श्रीरामाचे मंदीर असावे ही त्यांची प्रबळ इच्छा होती ती सिद्ध सदगुरु शांतीनाथ महाराज खाजगीत नेहमी व्यक्त करायचे .भारताचे पंतप्रधान व मुख्यमंत्री योगीजी तसेच सर्व मान्यवर यांच्या उपस्थितित या मंदिर बांधकाम कार्याचा शुभारंभ पार पडला त्यामुळे सिद्ध शांतीनाथ महाराज उपरोक्त पुढाऱ्यांविषयी आत्मविश्वास बळावला असुन सिद्ध सदगुरु शांतीनाथ महाराज यांनी यावेळी आनंद व्यक्त केला. मा. योगी आदित्यनाथ सिद्धसदगुरु शांतीनाथ महाराज यांचे निकटवर्तीय असून त्यांचे कार्यकाळात राम जन्मभूमी येथे प्रभु श्रीरामाचे मंदीराचे भूमीपूजन झाल्याने नाथ सांप्रदायास आनंद झाला असुन सर्व भारतीयांना नवचैतन्य देणारी नाथ सांप्रदायाची अमूल्य व तत्वसिद्ध परंपरा असल्याचे मत सिद्ध सदगुरू शांतीनाथ महाराज यांनी यावेळी व्यक्त केले.