संगितसूर्य कलामहोत्सवात वाशिमचा संच ठरला विजेतेपदाचा मानकरी
कारंजा:-( कारंजा वृत्तकेसरी)
मराठा सेवा संघ प्रणित संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन कला महोत्सवातील ९ दिवस सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात वाशिम जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. अवघ्या एक महिन्यापूर्वी जिल्हाध्यक्षपदी निवड झालेल्या शामभाऊ वानखेडे व जिल्हा सचिव गोपाल खाडे यांनी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बोरसे यांच्या नेतृत्वात आपल्या दमदार कार्याला सुरुवात केली.
मराठा सेवा संघ प्रणित संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदे व्दारा संगितसूर्य केशवराव भोसले यांचे जयंतिनिमित्त ९ दिवस व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्या कार्यकमांना मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे अध्यक्ष म्हणुन उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सोशल मिडीयावर आयोजन राज्य अध्यक्ष वर्षाताई धाबे यांचे मार्गदर्शनात करण्यात आले.दि.८ ऑगस्ट २०२० आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद
वाशिम जिल्ह्याचा बहारदार कार्यक्रम सादर झाला.यात मुरलीधर ताथोड धानोरा यांचे गायन
राजेंद्र सुर्वे पेडगाव यांचे बासरी वादन झाले.इचुकाटा फेम एकपात्री प्रयोग कलाकार गोपाल खाडे कारंजा यांचा येडी म्हणता मला हा एकपात्री प्रयोग सादर झाला.तर डॉ.विजय काळे वाशिम यांनी भाकरीचा मेळ ही कविता दमदारपणे सादर केली.
लोकशाहीर श्याम वानखडे पार्डी ताड यांनी शाहिरी बाजात संगितसुर्य केशवराव भोसले यांचा स्वरचित पोवाडा सादर केला तर
कु.ऐश्वर्या डहाळके रिसोड ह्यांनी उगवली शुक्राची चांदणी हे लावणी नृत्य सादर केले.
सोबतच प्रसिद्ध सूत्रसंचालक चाफेश्वर गांगवे रिसोड यांनी या कार्यकमाचे बहारदार सूत्रसंचालन केले.या कार्यक्रमाला संगितसाथ कीबोर्ड वादक रवी वाघमारे,
ढोलकी वादक श्रीधर ठाकरे,तबला वादक गणेश तडसे यांनी उत्तम साथ दिली तर सोशल मीडिया प्रभारी नितीन जोगदंड यांनी प्रसिद्धीची भूमिका उत्तम वठवली.
सर्व समावेशक अशा सांस्कृतिक सादरीकरणाचा राज्यातुन पहिला क्रमांक आला.
खा.डॉ.शिवश्री.अमोल कोल्हे यांनी विजेता म्हणुन वाशिम जिल्ह्याच्या नावाची घोषणा केली. या महोत्सवात एकूण १८ जिल्हे सहभागी झाले होते.रसिक श्रोत्यांनी हजारो लाईक्स व कमेंट्स देवुन कलाकाराचा उत्साह वाढविला.
संपूर्ण वाशिम टीमने मेहनत घेवुन संघास विजेतेपद मिळवुन दिले.संगितसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा वर्षाताई धाबे,महासचीव
प्रमिलाताई भिसे कार्याध्यक्षअरविंद पाटील विभागीय अध्यक्ष संजय बाबळसुरे मराठा सेवा संघाचे विभागिय अध्यक्ष अशोकराव महाले, जिल्हाध्यक्ष प्रशांत बोरसे सचिव नारायण काळबांडे यांनी कौतुक केले.