झील इंटरनॅशनल स्कूल येथे ऑनलाईन समुपदेशन... (जिल्हा समुपदेशक राजेश सुर्वे यांचे मार्गदर्शन)

झील इंटरनॅशनल स्कूल येथे ऑनलाईन समुपदेशन...


(जिल्हा समुपदेशक राजेश सुर्वे यांचे मार्गदर्शन)


 


कारंजा:(संदीप क़ुर्हे) १९ऑगस्ट २०२०


        -कोरोना महामारी मुळे प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या नाहीत म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिक्षण देण्यात यावे,असे शासन व शिक्षण विभागाकडून निर्देश देण्यात आलेत.संस्थेचे अध्यक्ष सुनील मेश्राम यांचे मार्गदर्शनात १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११:१५ ते १२:३० या वेळात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम चे जिल्हा समुपेशक राजेश सुर्वे यांचे गूगल मीट अँप्स द्वारा विध्यार्थ्यांना ऑनलाईन समुपदेशनाचे आयोजन करण्यात आले होते.


        सदर समुपदेशन कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक सुधीर मनोहर यांनी केले. राजेश सुर्वे यांनी प्रोत्साहन व प्रेरणा मानवी जीवनात कशा महत्वाच्या आहे. त्याचा विचार प्रक्रियेशी कसा सम्बध आहे. याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं.यावेळी ३६ विद्यार्थी उपस्थित होते.विध्यार्थ्यांना सोबत काही पालकही या ऑनलाईन समुपदेशन कार्यक्रमात सहभागी झाले होते. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षिका सोनाली सहारे यांनी केले.