जिल्हाभरात आणखी २८ कोरोना बाधित तर २० कोरोनामुक्त

जिल्हाभरात आणखी २८ कोरोना बाधित तर २० कोरोनामुक्त


कारंजा:(संदीप क़ुर्हे) दि २७ ऑगस्ट


जिल्ह्या माहिती कार्यालयाच्या प्राप्त माहिती नुसार आज दिवसभरात वाशिम जिल्ह्यात काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण २८ बधितांची नोंद झाली असून २० रुग्णाची कोरोनातून मुक्तता झाली आहे वाशिम शहरातील तिरुपती सिटी परिसरातील १, अनसिंग येथील १, मालेगाव शहरातील वॉर्ड क्र. सहा येथील ६, मंगरूळपीर शहरातील मंगलधाम परिसरातील २, सुभाष चौक परिसरातील २, शेलूबाजार येथील ७, लाठी येथील ५, नागी येथील १, कारंजा लाड शहरातील महावीर कॉलनी परिसरातील १, संतोषी माता कॉलनी परिसरातील १, मानकनगर परिसरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 


       २० व्यक्तींना डिस्चार्ज


        वाशिम शहरातील टिळक चौक, भटगल्ली परिसरातील १, दत्तनगर येथील १, नंदीपेठ येथील १, रिसोड शहरातील अयोध्यानगर येथील २, बेलखेडा येथील १, सवड येथील १, येवती येथील ३, मंगरूळपीर शहरातील राधाकृष्ण नगर येथील १, धानोरा बु. येथील १, शिवणी येथील १, शेलूबाजार येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील ३, मानोरा तालुक्यतील नैनी भोयणी येथील १, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील २ अशा रुग्ण ला कोरोना आजरातून बरे झाले मुळे सूटी देण्यात आली आहे 


जिल्ह्याबाहेर आणखी ९ कोरोना बाधित व्यक्तींची नोंद झाली असून जिल्ह्याबाहेर उपचार घेत असलेल्या १४ व्यक्तींना डिस्चार्ज मिळाला आहे.


दरम्यान, २३ ऑगस्ट रोजी कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या शेलूबाजार येथील ७५ वर्षीय व्यक्तीचा काल, २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी मृत्यू झाला. तसेच २४ ऑगस्ट रोजी रात्री जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या व काल, २६ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या शेलूबाजार येथील ८४ वर्षीय व्यक्तीचा कोरोना विषयक अहवाल काल रात्री पॉझिटिव्ह आला आहे.


        कोरोना बाधितांची सद्यस्थिती


      एकूण पॉझिटिव्ह –१५६६


       ऍक्टिव्ह – ३७५ 


      डिस्चार्ज – ११६१


        मृत्यू – २९ (+१) 


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)