दुपार व संध्याकाळ च्या अहवालात झाले ४१ कोरोना बाधीत तर ३५ रुग्णाची कोरोनावर मात
कारंजा:(प्रतिनिधी) दि १४ ऑगस्ट
प्रशासना कडून प्राप्त माहिती नुसार आज जिल्ह्यामध्ये एकूण ४१ बाधीत आढळलेले असून त्या मध्ये दुपारच्या अहवालात मालेगाव
तालुक्यातील शिरपूर जैन येथील ७ कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील लाकडीपुरा परिसरातील २ व्यक्ती असे एकूण 9कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
शिवाय संध्याकाळ च्या अहवालात ३२ कोरोना बाधीत आढळलेले आहेत ज्यामध्ये वाशिम शहरातील पतंजली चिकित्सालय परिसरातील १, ड्रीमलँड सिटी परिसरातील १, कोल्ही परिसरातील १, रिसोड शहरातील एकटा नगर येथील १, आसेगाव पेन येथील १, चिंचाबाभर येथील २, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १२, मंगरुळपीर तालुक्यातील गिंभा येथील १, कारंजा_लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, शिवनगर येथील १, आखतवाडा येथील ५, मोरंबी येथील १, सोहळ येथील ३ आणि भिलडोंगर येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
आज ३५ कोरोना बाधितांची कोरोना वर मात
वाशिम शहरातील सुदर्शन नगर येथील ८, टिळक चौक येथील १, अनसिंग येथील ३, मंगरुळपीर शहरातील तहसील कार्यालय परिसरातील ४, शिवाजीनगर येथील ३, कवठळ येथील १, कारंजा_लाड शहरातील माळीपुरा येथील ३, विद्याभारती कॉलनी परिसरातील १, सिंधी कॅम्प परिसरातील १, भामदेवी येथील १, कामरगाव येथील ५, उंबर्डा बाजार येथील १, पोहा येथील ३ व्यक्तींना अशा एकूण ३५ बाधितानी कोरोना वर मात केल्याने आज त्याना सूटी देण्यात आली आहे.
एकूण पॉझिटिव्ह –११२९
ऍक्टिव्ह – ३७६
डिस्चार्ज – ७३३
मृत्यू – १९ (+१)
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)