जिल्ह्यात तब्बल ५९ जन कोरोनामुक्त पैकी कारंजाचे ४४ कोरोनामुक्त तर २१ आढळले कोरोनाबाधित
कारंजा: (संदीप क़ुर्हे)
जिल्ह्या माहिती कार्यालय कडून प्राप्त माहिती नुसार काल रात्री उशिरा व आज सकाळी प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील दंडे चौक येथील १, देगाव येथील २, अनसिंग येथील १, कारंजा लाड शहरातील माळीपुरा येथील १, सुंदरवाटिका परिसरातील १, सोहोळ येथील ४ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.तर दुपारच्या अहवालात ५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे शिवाय आणखी ११ कोरोना बाधित सुद्धा आढळलेले आहेत कोरोनामुक्त झाल्या मध्ये कारंजा शहरातील वाणीपुरा येथील १०, पोलीस स्टेशन परिसरातील ६, दामिनी नगर येथल ४, तुषार नगर येथील १, भारतीपुरा येथील २, अशोक नगर येथील ७, शिंदे शाहकार नगर परिसरातील ३, बायपास परिसरातील १, शिक्षक कॉलनी परिसरातील ३, एम. बी. आश्रम परिसरातील १, कोहिनूर नगर येथील १, रामा सावजी चौक परिसरातील १, संतोषी माता कॉलोनी येथील १, सिंधी कॅम्प येथील १, आनंद नगर येथील १, इंदिरा नगर येथील १, उंबर्डा बाजार येथील १, कामरगाव येथील १, वढवी येथील १, मोरंबी येथील १, मंगरूळपीर शहरातील शशीमोहन टॉकीज परिसरातील १, सिद्धी नगर येथील १, पठाणपुरा येथील १, चिखली येथील ४, वाशिम तालुक्यातील अनसिंग येथील १, रिसोड शहरातील गणेशनगर येथील १, मानोरा तालुक्यातील गिरोली येथील २ अशा एकूण ५९ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, वाशिम शहरातील सुदर्शन नगर परिसरातील २, काटीवेश परिसरातील १,
मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील १, मुठ्ठा येथील १, मानोरा तालुक्यातील गुंडी येथील १, रिसोड तालुक्यातील गोहगाव हाडे येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
तसेच अकोला येथे उपचार घेत असलेले *वाशिम* शहरातील मंगळवार वेस परिसरातील १, धुमका येथील १,
रिसोड तालुक्यातील एकलासपूर येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे काल निष्पन्न झाले आहे.
*सद्यस्थिती*
एकूण पॉझिटिव्ह –९५६
ऍक्टिव्ह – ३५९
डिस्चार्ज – ५७८
मृत्यू – १८ (+१)
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)