गणेशउत्सव,मोहर्रम सनोउत्सव बाबत जिल्ह्या पोलिस अधिक्षक वसंतजी परदेशी यांचे मार्गदर्शन

गणेशउत्सव,मोहर्रम सनोउत्सव बाबत जिल्ह्या पोलिस अधिक्षक वसंतजी परदेशी यांचे मार्गदर्शन


कारंजा (संदीप क़ुर्हे) दि.२१ -


     स्थानीक महेश भवन येथे काल दि. २० ऑगस्ट २०२० रोजी ११.३० ते ०१.३० या दरम्यान वाशिम जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक मा.वसंत परदेशी यांच्या मुख्य मार्गदर्शनात शांतता समितीची सभा संपन्न झाली. आगामी काही दिवसांमध्ये येणार्‍या गणेशोत्सव, मोहरम व पुढेही साजरे होणारे सण व उत्सव यांचे पार्श्‍वभूमीवर शहरात, तालुक्यात व जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहावी याबाबत मार्गदर्शन करणेसाठी तसेच विविधांगी माहिती देण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. 


 सभेचे मुख्य मार्गदर्शक म्हणून जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल जाधव, तहसिलदार धिरज मांजरे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटिल, मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, पोलिस निरीक्षक सतीश पाटिल हे प्रामुख्याने उपस्थित होते. 


      सर्वच मान्यवरांनी व अध्यक्षांनी यावेळी नागरिकांनी उत्साहात परंतू कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावात सावधानी बाळगत साध्या पद्धतीने उत्सव साजरे करावेत असे आवाहन केले. मोठा गाजावाजा न करता, नियमांचे पालन करुन ह्या रोगापासून स्वत:चा बचाव करीत यावर नियंत्रण मिळविता येईल असे व्यवहार करावेत असे आवाहनही मान्यवरांनी केले. 


    वर्ष २०१९ मध्ये श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडल्याबाबत यावेळी धनज, मानोरा, कारंजा ग्रामीण व कारंजा शहर पोलिस स्टेशन हद्दीतील एकूण १२ श्री गणेश मंडळांना पोलिस अधिक्षक व मान्य वर यांच्या हस्ते पारितोषीक व सन्मानचिन्ह प्रदान करुन या श्री गणेश मंडळांचा गौरव करण्यात आला. 


      या सभेला श्री गणेश मंडळांचे पदाधिकारी, मोहरम मंडळांचे पदाधिकारी, शांतता समिती सदस्य, जेष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बंधू आदी उपस्थित होते.