करीअर प्लानर प्रा.निर्मलसिंह ठाकूर यांनी साधला यावर्डीच्या विद्यार्थ्यांसी ऑनलाईन संवाद

करीअर प्लानर प्रा.निर्मलसिंह ठाकूर यांनी साधला यावर्डीच्या विद्यार्थ्यांसी ऑनलाईन संवाद


(प्रो.निर्मलसिंह ठाकूर यांनी "करिअर" बाबत मार्गदर्शन केले.गूगल मीट अँप्स द्वारा ऑनलाईन संवाद)


 


कारंजा प्रतिनिधी/२२ऑगस्ट २०२०


       कोरोना महामारी मुळे प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या नाहीत म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिक्षण देण्यात यावे,असे शासन व शिक्षण विभागाकडून निर्देश देण्यात आलेत. त्यानुसार सर्व शाळांमध्ये ऑनलाईन वर्ग सुरू झालेत. मुख्याद्यापक विजय भड यांचे मार्गदर्शनात ग्राम यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयातील विद्यार्थ्यांना ११ जुलै पासून गुगल मीट या अँप्सद्वारे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. सदर शाळा येथेच न थांबता विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबत विविध तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन आयोजित करत आहे.यामध्ये प्रो.निर्मलसिंह ठाकूर यांनी करिअर प्लॅनिंग या विषयावर साधला यावर्डीच्या विद्यार्थ्यांसी ऑनलाईन संवाद.


       दिनांक २० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६:१५ ते ७:३०वाजेपर्यंत बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी या शाळेच्या ऑनलाईन वर्गात विद्यार्थ्यांशी करिअर प्लॅनिंग या विषयावर ऑनलाईन संवाद साधण्या करिता पनवेल,मुंबई येथील असिस्टंट प्रोफेसर, आदिशक्ती महिला बहुउद्देशीय संस्थांचे संचालक तथा करिअर कौंन्सिलर प्रो.निर्मलसिंह ठाकुर उपस्थित होते.त्यांनी करिअर निश्चित करतांना कोणत्या क्षमता आपल्या मध्ये आहेत? त्याकरीत कोणते शिक्षण घेणं आवश्यक आहे?ते कुठे उपलब्ध आहे? हे जाणून घेणे आवश्यक आहे.त्यानुसाच आपले करिअर ठरवावे. याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.


         यावेळी ऑनलाईन क्लास मध्ये वर्ग ८,९ व १० चे एकुन ६२ विद्यार्थी प्रत्यक्ष जॉईन होते.


          विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केल्याबद्दल मुख्याध्यापक विजय भड यांनी प्रो.निर्मलसिंह ठाकूर यांचे आभार मानले.        


           कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार अनिल हजारे यांनी केले. सदर ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाला शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सम्पूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे.