कोरोना ने फास आवळला
आणखी १६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह
वाशिम:(कारंजा वृतकेसरी )दि १७
मंगरूळपीर कोविड केअर सेंटर येथे आज झालेल्या अँटीजेन रॅपिड टेस्टमध्ये एकूण ११ व्यक्ती बाधित आढळल्या आहेत. यापैकी १० व्यक्ती कारंजा लाड येथील बाधितांच्या संपर्कातील आहेत.
यवतमाळ वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविलेले ५ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये मंगरूळपीर शहरातील पठाणपुरा येथील २ आणि कारंजा लाड शहरातील गायत्री नगर येथील १, जिजामाता चौक कारंजा १ व चुना पुरा कारंजा १ व्यक्तीचा समावेश आहे.
कारंजात काल आणि आज एकूण ८ रुग्ण आढळून आले होते पैकी कालचे ४ ही रुग्ण हे पोलिस कर्मचारी आहेत व १ पो कर्मचार्याचा मुलगा असल्याचे समजते आजही मंगरुलपीर मध्ये रैपिड टेस्ट मध्ये ११ पैकी ९,बाधित हे पोलिस कर्मचारी असल्याचे समजते आढळलेले बाधित कर्मचारी महसुल, पोलिस, आरोग्य, नगर परिषद यंत्रणा ह्यांतील प्रत्येक घटक हा रस्त्यावर उतरून ड्युटी करताना तो स्वत:चा विचार न करीत नागरिकांसाठीच स्वत:चा जीव धोक्यात घालून कार्य करीत आहेत परंतु पोलिस कर्मचारी हा कोणतीही सुरक्षा साधने न वापरता आपले जीव धोक्यात घालून कार्य करीत आहे
ऑपरेशन ऑल आउट ची मोहिम मधान्तरि जिल्ह्या पोलिस प्रशासना कडून कोणतीही सुरक्षा साधने न वापरता राबविण्यात आली होती आणि ह्याच ऑपरेशन ऑल आउट मोहिमेतच काही पोलिस कर्मचारी कुण्यातरी बाधिताच्या संपर्कात आल्याची शक्यता नाकारता येत नाही १६ जुलै रोजी अँटीजेन रॅपिड टेस्टमध्ये कोरोना बाधित असल्याचे निदान झालेल्या शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील व्यक्तीचा आज दुपारी जिल्हा कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. सदर व्यक्तीला १६ जुलैरोजी सकाळी ११ वा. दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याची तब्येत पूर्णतः खालावलेली होती. अँटीजेन रॅपिड टेस्टमध्ये त्याला कोरोना विषाणू संसर्गाचे निदान झाले. सदर व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत होता, तसेच शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाली होती. सदर व्यक्तीला अगोदरपासूनच किडनीचा आजार होता, त्याची किडनी निकामी झाली होती. तसेच त्याला रक्तदाब सुद्धा होता. उपचारादरम्यान आज, १७ जुलै रोजी दुपारी ३ वा. दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
तरी प्रशासना तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कुणीही कामाशिवाय घराबाहेर मास्क शिवाय निघू नये काम असेलच तर घरातील एकाच व्यक्तिने बाहर निघुन कामे आटपुन प्रशानाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे