प्रतिबंधीत क्षेत्रातील व्यवसाईकानी शहरातील दुकाने उघडून केला साथरोग प्रतिबंधक कायद्याचा भंग गुन्हे दाखल करण्यासाठी नगर पालिका प्रशासनाची पोलिसांत तक्रार

प्रतिबंधीत क्षेत्रातील व्यवसाईकानी शहरातील दुकाने उघडून केला साथरोग प्रतिबंधक कायद्याचा भंग


   कारवाई होणार का याकडे नागरिकांचे लक्ष्य


कारंजा :(लाड़) दि 11


   व्यापाऱ्यांच्या परिसर संमजल्या जाणाऱ्या सिंधी कैम्प परिसरात कालच कोराना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला असल्याने कोरोना नोडल अधिकारी व उपविभागीय अधिकारी कारंजा यांचे आदेशानुसार, हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला होता त्यामुळे हा परिसर सिल करण्यात आला. 


  असे असतांनाही आज 11 जुलै रोजी प्रतिबंधीत क्षेत्र मध्ये राहणार्‍या काही व्यापार्‍यांनी नियमांचे उल्लंघन करीत प्रतिबंधीत क्षेत्राचे बाहेर येवून शहरातील बाजारातील दुकाने उघडन नियमाची ऐसी तैसी केल्याचे दिसले. त्यांच्या या कृत्यामुळे प्रतिबंधीत केलेल्या परिसराच्या बाहेर कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने  


 या व्यावसायकानी केलेल्या या बेजबाबदार कृत्यामुळे संसर्गाचा धोका वाढला असून आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ चा भंग केलेला आहे. परिणामी यामुळे सिंधी कॅम्प परिसरातील 5 व्यावसायिका विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याने नगर परिषदचे वतीने उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर यांनी . 


    साथ रोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ चे कलम २,३ व ४ आपत्ती व्यवस्थापनन कायदा २००५ चे कलम ५१ ब व भांदवी १८६० चे कलम १८८, २६९, २७० व २७१ नुसार कायदेशीर कारवाई करण्याची व या पाचही जणांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार


केल्याची माहितीआहे परंतु याविरुद्ध पोलिस प्रशासन काय कारवाई करते या कड़े नागरिकाचे लक्ष्य केंद्रित झाले आहे