तौसिफ मामदाणी कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानीत
कारंजा:(अमित संगेवार)
सहारा सुपर सर्विसेस तथा मामदाणी लैण्ड डेवलपर चे संचालक तौसीफ युसूफजी मामदानी यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ,मुंबई शाखा कारंजा लाड यांच्या वतीने कारंजा शहरातील युवा उद्योजक तथा सामाजीक कार्यकर्ते तौसिफ भाई मामदाणी यांना कोरोना योद्धा म्हणून गौरविन्यात आले आहे
सदर पुरस्कार त्यांना कोविड-१९ संक्रमनाच्या आणीबाणीच्या काळात त्यांनी सर्वसामान्य जनतेची तन,मन,धनाने सेवा करून जो आधार दिला त्याबद्दल त्यांना पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष सुनील फुलारी,तालुका अध्यक्ष किरण क्षार,उपाध्यक्ष,दिलीप पाटील रोकडे, सचिव रामदास मिसाळ यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आले