आमदार पाटणी यांच्या स्थानिक विकास निधीतून ‘एक हजार ‘रॅपीड अ‍ॅन्टिजन किट

आमदार पाटणी यांच्या स्थानिक विकास निधीतून  


‘एक हजार ‘रॅपीड अ‍ॅन्टिजन किट’


 


 कारंजा: (संदीप क़ुर्हे)


     कोरोनाबाधितांची वाढती संख्या, संशयीत रूग्णांना होणारा त्रास तसेच सतत सेवा प्रदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी स्वब तपासणीची प्रक्रिया गतिमान होणे गरजेची आहे. हे लक्षात घेता, संकट समयी आमदार राजेंद्र पाटणी यांनी स्थानिक विकास निधीमधून ५ लक्ष रूपयांच्या एक हजार ‘रॅपीड अ‍ॅन्टिजन किट’ उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना पत्र दिले होते. ज्याला जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता दिली.


     राज्य शासनाने यापूर्वी वाशिम जिल्ह्याकरिता केवळ एक हजार किट उपलब्ध करून दिल्या होत्या, ज्या तालुकानिहाय १०० ते १५० किट हिश्यावर आल्या होत्या. आमदार पाटणी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे आता कारंजा-मानोरा मतदार संघासाठी एक हजार किट उपलब्ध होणार हे विशेष. आवश्यकतेनुसार वेळो-वेळी निधी उपलब्ध करून दिल्या जाईल अशी ग्वाही आमदार पाटणी यांनी याप्रसंगी दिली. 


      ‘रॅपीड अ‍ॅन्टिजन किट’ मुळे आता झटपट चाचणी होणार असुन लवकर पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करता येणार आहेत. केवळ अवघ्या अर्ध्या तासातच कोरोनाचे निदान होणार असल्याने नागरिकांची आता गैरसोय होणार नाही. कोरोनाची साखळी तुटावी या हेतूने आमदार पाटणी यांनी ‘रॅपीड अँटीजन टेस्ट’ किट उपलब्ध करून दिली आहे. कोविड सेंटर मध्ये दाखल कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीचे टेस्टिंग केले जाणार आहे. रुग्णांचे स्वब उशिराने येत असल्यामुळे रुग्ण संख्या वाढत होती. या किटमुळे कोरोना रूग्णांचे अहवाल आता प्रयोगशाळेत पाठवण्याची गरज नाही. आधीच्या टेस्ट दरम्यान कोविड सेंटरमधील रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत होती. त्यांची देखभाल आदीसाठी वेळ आणि पैसा खर्च होत होता. आता केवळ पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. नेहमीप्रमाणे रुग्णांचे स्वब आरटीपीसीआर टेस्ट करून घेतले जात होते. त्याचे अहवाल प्रयोग शाळेत पाठवावे लागत होते व अहवाल मिळण्यास दोन-तीन दिवस लागत होते. मात्र ‘रॅपीड अ‍ॅन्टिजन किट’ मुळे अवघ्या अध्या तासात स्वबचा अहवाल प्राप्त होणार आहे. कोरोनाचा पैâलाव रोखण्यासाठी वंâटेनमेन्ट झोनमध्ये रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्टच्या माध्यमातुन तपासणीला आता वेग येणार आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांवरील ताण निश्चितच कमी होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ५० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसह दुर्धर आजार असणाऱ्या हायरिस्कमधील व्यक्ती तसेच लहान मुलांचा समावेश असणार आहे. सर्वेक्षणाअंती तयार झालेल्या यादीनुसार परिसरात ‘रॅपीड अ‍ॅन्टिजन किट’ टेस्ट मोहिमेचे नियोजन केले जाणार आहे. वंâटेनमेन्ट झोनमधील शाळा किंवा समाज मंदिर परिसरात निवडलेल्या लोकांची तपासणी केली जाणार असल्याचे आमदार पाटणी म्हणाले.  


 


· राज्यशासनाने जिल्ह्याकरिता केवळ एक हजार किट


उपलब्ध करून दिल्या होत्या.


· आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्याची 


           आमदार पाटणी यांची ग्वाही


· केवळ अवघ्या अर्ध्या तासातच होणार कोरोनाचे निदान


· वेळ आणि पैसा खर्चाची बचत


· बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीचे टेस्टिंग


· सतत सेवा प्रदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील ताण कमी


· प्रयोग शाळेत अहवाल पाठविण्याची गरज नाही