कोरोना च्या आजच्या अहवालात १५ निगेटिव्ह तर११ पोझेटिव्ह

वाशिम वर कोरोणाची वक्र दॄष्टि आजचे


१५ अहवाल निगेटिव्ह,  तर ११ पॉझिटिव्ह


९ वाशिम तर २ मंगरूळपीर


वाशिम (जी मा का)


   वाशिम वर कोरोनाची वक्र दृष्टि आजच्या अहवालावरुन कायम असल्याचे दिसत आहे आज आलेल्या अहवाल  दुपारी २६ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी १५ अहवाल निगेटिव्ह आहेत. उर्वरित ११ व्यक्ती #कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये वाशिम शहरातील ९ व मंगरूळपीरमधील २ व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्वजण यापूर्वीच्या बाधितांच्या संपर्कातील आहेत.


 


वाशिम शहरातील गवळीपुरा परिसरातील १८ वर्षीय युवक, ११ वर्षीय मुलगा, २०, ३० व ३८ वर्षीय महिला, १४ व १६ वर्षीय युवती, तसेच गंगू प्लॉट परिसरातील ३५ व ४४ वर्षीय व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.


 


मंगरूळपीर येथील संभाजी नगर परिसरातील ३४ वर्षीय व्यक्ती व मदार तकिया, माळीपुरा परिसरातील ६६ वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.