संत गाडगे बाबा विचार मंच बहु संस्था तर्फे संत टेकड़ी येथे वृक्षरोपण व सौंदरिकरण

*संत गाडगेबाबा विचार मंच बहुउद्देशीय संस्था तर्फे मा श्री साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे याच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित भव्य वृक्षारोपण सोहळा*


ऐतिहासिक संत टेकडीेचे सौंदर्यीकरण! व भव्य वृक्षसम्मेलनाचा कार्यक्रम पार


   कारंजा: ( संदीप क़ुर्हे)


      निसर्गात वावरत असतांना मानव मोठ्याप्रमाणात नैसर्गिक संसाधनांचा वापर करत असतो. त्यामुळेच निसर्गाप्रतीसुद्धा मानवाच काहीतरी देणं लागतं असा प्रण घेत कारंजातील ऐतिहासिक ठिकाण असणार्‍या संत टेकडीच्या सौंदर्यीकरण्याचा निर्णय शहरातील समाजिक संघटनांकडून घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच संत गाडगेबाबा विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने काल दि. १९ रोजी भव्य वृक्षसम्मेलनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शहरातील ऐतिहासीक वास्तू म्हणून प्रसिद्ध असणार्‍या संत टेकडीवर मोठ्याप्रमाणात वृक्षारोपन करण्यात आले.


       संत गाडगे बाबा विचारमंच बहुउद्देशीय संस्था आणि रा.स्व.संघ या संघटना शहरातील समाजिक कार्यात नेहमिच अग्रेसर असतात. कडक लॉकडाउनमध्येसुद्धा भुकेलेल्यांची भूक भागवण्याचे काम संत गाडगेबाबा विचारमंच बहुउद्देशीय संस्थेने केले. तसेच हातावर पोट असणार्‍या मजूरांच्या घरात धान्याच्या कीट पोहचवण्याचे काम रा.स्व.संघाच्यावतीने करण्यात आले. रक्तदान शिबीरे, गरजूंना कपडे देणे असे सामाजिक ऊपक्रम गाडगे बाबा विचारमंच बहु. संस्था तसेच रा. स्व. संघाकडून कारंजा शहरात कायमच राबवण्यात येत असतात.


    निसर्ग आणि समाज हे एकमेकांत गुंतलेले घटक आहे. त्यामुळे निसर्गांचे रक्षण हेसुद्धा एकप्रकारचे समाजिक कार्यच आहे. संत टेकडी हे कारंजातील प्राचीन असे ऐतिहासीक ठिकाण आहे. आणि ऐतिहासिक ठिकाणांचे जतन करणे, जिर्णोद्धार करुन त्याचे सौंदर्यीकरण करणे हेसुद्धा आपले कर्तव्य आहे. असे मानून या भव्य वृक्षसम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कारंजा शहराचे तहसीलदार श्री धीरज मांजरे यांच्यावतीने वृक्षं ऊपलब्ध करुन देण्यात आले होते. या वृक्षसम्मेलनास कारंजातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी ऊपस्थिती लावत निसर्गाप्रती आपली संवेदशिलता व्यक्त केली. यावेळी संपर्कप्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे नगर कार्यवाह संजय नेमाने, धर्म जागरण परिषदेचे रघू वानखडे, कारंजा शहर पोलीस स्टेशन ए.पी.आय श्री जाधव साहेब, गोपनीय शाखेचे श्री प्रदीप ठाकरे मेजर, पत्रकार श्री समीर देशपांडे, ढोरे मेजर , श्री संजयजी कडोळे (जेष्ठ पत्रकार), पत्रकार श्री महेंद्र गुप्ता विशेष उपस्थिती होती.


       वृक्षसम्मेलनाच्या हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला होता. त्यापैकीच भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष श्री अमोल गढवाले, युवासेन शहरप्रमुख शंभूराजे जिचकार, संत गाडगे बाबा विचारमंच बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संतोष धोंगडे , उपाध्यक्ष राजेश भाऊ चंदन, कोषाध्यक्ष चंद्रकांत भोपाळे तसेच हे आहेत. कार्यक्रमासाठी आवश्यक असणार्‍या अनेक प्राथमिक गोष्टींची ऊपलब्धता यांच्यावतीने करुन देण्यात आली होती. समाजकार्यप्रती सकारात्मक असणारे सविज जगताप, अजिंक्य जवळेकर, राहुल देशमुख, मयुर लळे,अंकुश झोपाटे, मनिष दिक्षीत, सम्यक फुरसुले, भारत हँडगे, वल्लभ जगताप, समित बोंडे, प्रतीक , ई. युवक तसेच संस्थेचे मंडळींनी कार्यक्रमाच्या नियोजनाची धुरा सांभाळली. सोबतच वृक्षसंम्मेलनासाठी या युवकांकडून विशेष श्रम घेण्यात आले होते.