बँक कर्मचाऱ्यां वरील हल्ल्याचा बँक ऑफ इंडिया कारंजा शाखेतर्फे जाहीर निषेध*

बँक कर्मचाऱ्यां वरील हल्ल्याचा बँक ऑफ इंडिया कारंजा शाखेतर्फे जाहीर निषेध


कारंजा: (अमित संगेवार)


  वर्धा तालुक्यातील बैंक ऑफ इंडिया च्या साहूर शाखेत 1 जुलाई रोजी काही गाव गुंडानी शाखा कर्मचार्यावर विनाकरण हल्ला केला या घटनेचा कारंजा शाखेतर्फे जाहिर निषेध नोंदविन्यात आला आहे 


  सविस्तर प्राप्त माहीत नुसार 1 जुलाई रोजी शाखेचे कामकाज चालू असताना काही समाज कंटकानी क्रॉप लोन च्या नावा खाली कर्मचार्या शी वाद घालन्यास सुरुवात केली परिणामी वादाचे रूपांतर हानामारीत झाली कोरोना च्या संकटा मध्ये नागरिकांना जीवाची पर्वा न करता बैंक कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून बैंकिंग सेवा देत आहे प्रत्येक शासकीय विभागात कुठे 15 तर कुठे 30 40 टक्के उपस्थिति मध्ये शासकीय विभागात लोकडौन च्या काळात कामकाज चालत होते परंतु बैंकिंग क्षेत्रा मध्ये नागरिकांचे आर्थिक चक्र बंद पडूं नये म्हणून प्रत्येक बैंकेत कर्मचार्याची 100 टक्के उपस्थिति देवून सेवा दिली आहे तरीही असे हमले होत असतील तर आम्हाला विचार करावा लागेल असा इशारा कर्मचारी संघटनेने दिला आहे 


   तरी झालेल्या प्रकारांची चौकशी करुन गुन्हेगारावर कठोर कारवाहि करण्याची मागणी शाखा प्रबंधक व अधिकारी संघटनेचे कारंजा शाखेचे श्री अमित कवळकर, श्री विशाल ठाकरे सहायक व कर्मचारी संघटनेचे श्री अंकुश घाटे, सौ प्रेरणा सहारे व प्रवीण कडूकर आदिनी केली आहे