महाचक्रीवादळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अनुदान मंजुर
सोमवारपर्यंत बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश; आमदार पाटणी
कारंजा: (संदीप क़ुर्हे)
ऑक्टोंबर, नोव्हेंबर २०१९ मध्ये ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळाचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश शेतकरी या अनुदानापासुन वंचित होते. अशातच संचारबंदी व खरीप हंगाम असल्यामुळे प्रलंबित अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी यासाठी आमदार राजेंद्र पाटणी यांनी तारांकित प्रश्नासह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे मागणी केली होती. याबाबत महसुल व वनविभागाने २९ जून रोजी शासन निर्णयाव्दारे ही रक्कम मंजुर केली आहे. येत्या सोमवारपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही जमा होणार असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी सांगितले. वंचित शेतकऱ्यांमध्ये मानोरा तालुक्यातील ६३ गावातील २७९१ शेतकऱ्यांचे २ कोटी २५ लक्ष २४ हजार ८०० तर कारंजा तालुक्यात ६ गावातील १९७५ शेतकऱ्यांचे १ कोटी ३६ लक्ष ८४ हजार १३२ रूपये प्रलंबित होते. यामध्ये कारंजा तालुक्यातील शहा, यावार्डी, झोलगाव या उजाड गाव क्षेत्र अंतर्गत सोमठाण, दिघी येथील शेतकरी तसेच झोडगा, रापेरी, पानगव्हाण येथील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
मानोरा तालुक्यातील फुलउमरी, विठोली, माहुली, भुली, टेरका, मंडाळा, रामतीर्थ, शेंदुरजना,रूद्राळा, साखरडोह, ढोणी, जगदंबानगर, रोहणा, हळदा, यशवंतनगर, जनुना खु, तळप, नायणी, बोरव्हा, टेंभाळा, चाकुर, गोंडेगाव, चोंढी, देरडी, खापरी, भिलडोंगर, खांबाळा, उज्वलनगर, इंगलवाडी, जवळा बु., जवळा खुर्द, अभईखेडा, कोंडोली,गुंडी, धामणी, तोरणाळा, घोटी, जामदरा, गोस्ता, पाळोदी, हातना, दरा, भोयणी, दापुरा खु, उंबर्डा, जामणी, म.शहापुर, धानोरा भुसे, अजणी, कमळापुर, लोहारा, सावरगाव, उमरदरी, एकलाला, धानोरा खु, कुपटा, सिंगडोह, गिराट, वार्डा, गिर्डा, खेर्डा, खापरदरी व विळेगाव अशा ६३ गावातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची प्रलंबित अनुदानासाठी वारंवार विचारणा होत होती. याबाबत तारांकित प्रश्नासह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे मागणी केली होती. शासनाने मागणीची दखल घेत २९ जून प्रलंबित अनुदानाची रक्कम मंजुर केली असुन येत्या सोमवारपर्यंत ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बृँक खात्यात जमा करण्याचे निर्देश तहसीलदार कारंजा तसेच मानोरा यांना दिले आहेत.