आज दिवसभरात २६ कोरोना बाधित १ चा मृत्यु तर ,२१ कोरोनामुक्त
वाशिम: (जीमाका)
आज सकाळी रिसोड शहरातील पठाणपुरा येथील २, आसनगल्ली येथील १२ आणि मांगवाडी येथील ४ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच अकोला येथे उपचार घेत असलेल्या कारंजा लाड शहरातील मस्जिदपुरा परिसरातील एका महिलेला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे.
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २१ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये वाशिम शहरातील फकीरपुरा येथील १, इलखी (ता. वाशिम) येथील २, मंगरूळपीर शहरातील काझीपुरा येथील ४, पठाणपुरा येथील २, टेकडीपुरा येथील ३, रिसोड शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील ३, गजानन महाराज मंदिर परिसरातील २, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील १, साईनगर परिसरातील २ व अशोक नगर परिसरातील १ व्यक्तीचा समावेश आहे.
आज दुपारी प्राप्त अहवालानुसार आणखी ७ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. यामध्ये कारंजा लाड शहरातील रंगाडीपुरा परिसरातील ३, अशोक नगर परिसरातील १, मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा येथील २, तऱ्हाळा येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.
दरम्यान, २६ जुलै रोजी कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या वाशिम शहरातील बेलदारपुरा येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा काल, २८ जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ५६५
ऍक्टिव्ह – २०६
डिस्चार्ज – ३४८
मृत्यू – ११
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे)