कारंजातील खोळम्बलेल्या विकास कामासाठी शहर भाजपाने थोपटले दंड
कारंजा न.प.मधील सुवर्णजयंती नगरोथान महाभियान अंतर्गत पाणीपुरवठा योजना पुन्हा पूर्ववत करण्यात यावी --नगरसेविका सौ माहितकर यांची मागणी
कारंजा शहर भाजपा ने दिले मुख्याधिकारी यांना दिले विविध समस्या बाबत निवेदन
कारंजा: (संदीप क़ुर्हे) दि २०
कारंजा शहरात मा.आमदार राजेंद्रजी पाटणी यांच्या पुढाकाराने सुवर्ण जयंती नगरोथान अभियानांतर्गत पाणी पुरवठा योजना २०१६ मध्ये मंजूर करण्यात आली होती. या बाबत शहराच्या विविध भागात पाईपलाईन टाकणे व पाणी टाकी बांधकाम सुद्धा २०१८ पर्यंत करण्यात आले. परंतु काही तांत्रिक व प्रशासकीय अडचणीमुळे ही योजना मधातच थांबविण्यात आली, या संदर्भत अजूनही तोडगा निघाला नसून,या कामावर खर्च झालेला कोट्यवधी रुपये वाया जाते की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या निधीचा असा वापर होणे योग्य नाही.यासाठी याबाबत न.प मार्फत पाठपुरावा करणे गरजेचे आहे. ही योजना पूर्ण होणे ही कारंजावासीयांसाठी महत्वाचे आहे. जेणेकरून कारंज्यातील भविष्यातील पाणीटंचाई दूर होईल. धूळखात पडलेल्या योजने संदर्भात लक्ष वेधण्यासाठी कारंजा शहर भाजप अध्यक्ष श्री ललित चांडक यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मुख्यअधिकारी याना निवेदन दिले. यावेळी नगरसेविका सौ प्राजक्ता माहितकर, सौ.चंदाताई कोळकर , व्यापारी आघाडी जिल्हा संयोजक महेंद्रजी लोडाया , सरचिटणीस शशी वेरुळकर,रणजित रोतेले, महिला अध्यक्ष सौ.पायल तिवारी , युवा मोर्चा अध्यक्ष अमोल गढवाले , ललित तिवारी , सोशल मिडिया प्रमुख जिग्नेश लोडाया* आदी उपस्थित होते. वरील निवेदनाद्वारे कारंजा शहरातील विविध समस्ये बाबत भाजपने दंड थोपटल्याचे चित्र दिसत आहे.
वार्ड क्रमांक 20 मधील सन्तोषी माता कॉलोनी मधील मंजूर फेवर ब्लॉक चा रस्ताच कंत्राटदाराने काम न करताच गायब केल्याची चर्चा आहे
कारंजा वासियाना नुकतेच नगर पालिका चा पदभार सांभाळणारे नवीन पण जुनेच मुख्यअधिकारी डोलारकर है एक अनुभवी अधिकारी मिळाले असल्याने कारंजेकरच्या आशा पल्लवित झाल्या आहेत ते पुन्हा बंद पडलेल्या विकासकामा कड़े लक्ष्य केंद्रित करतील ही जनभावना आहे