'डॉक्टर्स डे' निमित्य निमा संघटनेने केला कोरोना योध्यानचा सत्कार

 डॉक्टर्स डे निमित्य कोरोना योद्धाचा सत्कार सोहळा संपन्न


 कारंजा: (कारंजा वृत्तकेसरी)


       महावीर ब्रम्हचारी आश्रम कारंजा येथे 1 जुलई 20 रोजी आयुष दिन म्हणजे 'डॉक्टर्स डे' निमित्य निमा संघटने कडून शहरातील कोरोना योद्धा चा सत्कार समारोह आयोजन करण्यात आला होता या सत्कार समारोहात शहरातील सफाई कर्मचारी ,आरोग्य सेवक,प्रशासनिक अधिकारी,व निमा के डॉक्टर्स जसे डॉ अविश दरेकर, डॉ भेड़े, डॉ दिलीप खेमवानी,डॉ वाघमारे, डॉ आशीष गरीबे, डॉ स्वप्निल ठाकुर,सौ लकडे,सौ खेमवानी,सौ उपाध्ये,डॉ धकाते, डॉ बोन्ते डॉ, मतीन शेख आदिनचा तहसीलदार धीरज मांजरे व तालुका आरोग्य अधिकारी किरण जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ह्या वेळी तहसीलदार धीरज मांजरे तथा ता आरोग्य आधिकारी किरण जाधव यांचा सुद्धा निमा तर्फे सत्कार करण्यात आला 


   ह्यावेळी कोरोना साथरोग वेळी शहरातील डॉक्टरांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे मत तहसीलदार धिरज मांजरे यांनी व्यक्त केले प्रसंगी निमा चे अद्यक्ष डॉ मनोज गिदवानी सचिव डॉ अमोल उगले सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ सुशील देशपांडे यांनी केले तर आभार डॉ उल्हास काटोले यानी मानले