ग्रामीण भागातील विद्यार्थीही गिरवितात आॅनलाईन अभ्यासाचे धडे
(यावार्डी येथील धाबेकर विद्यालयाचा पुढाकार, आठवी, नववी व दहावीतील 80 टक्के विद्यारथींचा सहभाग)
कारंजा- ( संदीप क़ुर्हे)
कोरोनाच्या संकटामुळे घेाषित करण्यात आलेल्या लाॅकडाऊनने यंदाचे शैक्षणिक सत्र कधी सुरू होईल हे सांगता येत नसल्याने शासनाच्या वतीने आॅनलाईन शिक्षण सुरू करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहे. त्यानुसार कांरजा पं स अंतर्गत येत असलेल्या यावार्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात 11 जुलैपासून हे आॅनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले असून शाळेतील इयत्ता आठवी, नववी व दहावीतील 80 टक्के विद्यार्थी यात सहभागी हेात आहे. यावरून ग्रामीण भागातील विद्यार्थीही आॅनलाईन अभ्यासाचे धडे गिरवित असल्याचे दिसत आहे.
शासनाने विद्यार्थांना आॅनलाईन शिक्षण देण्याचे धेारण अवलंबिल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनची व पालकांची अॅन्ड्राॅईड मोबाईल खरेदीची परिस्थिती नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहतील,अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु यावार्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयातील शिक्षकांनी पालकांनच्या घरी जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर मात करीत हा आॅनलाईन शिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे. मुख्याध्यापक विजय भड यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात शाळेतील सर्व शिक्षकांनी सर्व विषयांचे ज्ञान विद्यार्थ्याना आॅनलाईन पध्दतीने प्रदान करीत आहे. यासाठी त्यांचे शालेय वर्गानुसार गृप तयार करण्यात आले असून गुगल मिट अॅपच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षक वेळापत्रका नुसार या उपक्रमात सहभागी होत आहे. यावार्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालय हे आॅनलाईन शिक्षण सुरू करणारी ग्रामीण भागातील पहिली शाळा आहे. या शाळेचा आदर्श इतर शाळांनी गिरविल्यास ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही एवढे नक्की.
"आम्ही सुरवातीला गावचा सर्वे करून सर्व वर्गाचा कच्चा डाटा तयार केला.किती विद्यार्थ्यांनकडे अँड्रॉईड मोबाईल आहेत? किती विद्यार्थ्यांनकडे साधे मोबाईल आहेत? किती विद्यार्थ्यांनकडे जिओ चे मोबाईल आहेत? त्यानंतर वर्ग 9&10 चे 05 जुलै पासून गणित हा विषय सुरू केला,त्यामध्ये यश असल्यावर वर्ग 8,9&10 वीचे सर्व विषयाचे सर्व शिक्षकांनी गूगल मिट या अँप्स द्वारे ऑनलाईन शिक्षण सुरू केले.आज जवळपास 80% विद्यार्थ्यां ऑनलाईन शिक्षण घेत आहेत"
विजय भड
मुख्यध्यापक,बाबासाहेब धाबेकर विद्यालय
यावार्डी ता कारंजा जी वाशिम