इंधन दर वाढीच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेसचे धरणे आंदोलन
कारंजा : (प्रतिनिधी)
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव वाढलेले नसतांना केंद्रातील भाजपा प्रणित सरकारने पेट्रोल व डिजल चे दर भरमसाठ वाढविले आहे या भाव वाढीच्या निषेधार्थ काँग्रेस च्या राष्ट्रीय अध्यक्षा मा सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा बाळासाहेब थोरात यांचे आदेशाने काँग्रेस नेते मा हाजी मो युसुफसेठ पुंजानी व वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा दिलीपजी सरनाईक यांचे मार्गदर्शनाखाली ४जुलै रोजी कारंजा तालुका काँग्रेस व कारंजा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने कारंजा तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करून कारंजा तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले संपूर्ण भारतात २१ मार्च पासून कोविड १९ कोरोना विषाणूचे संक्रमन रोखण्यासाठी लॉक डाऊन लावण्यात आले आहे ज्यामुळे गोर गरीब सामान्य वर्ग,कामगार, मजूर आदी घटकांना कोणताच रोजगार नसल्याने आर्थिक संकट कोसळलेले आहे अशा विपरीत परिस्थितीत पेट्रोल व डिजलच्या दरात भरमसाठ वाढ करणे योग्य नाही वाढलेले दर त्वरित कमी करावे या मागणीसाठी धरणे आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी काँग्रेसचे दिलीप भोजराज,राजाभाऊ डोणगावकर,एम टी खान,फिरोज शेकूवाले, सलीम गारवे,जुम्मा पप्पूवाले,इर्शाद अली,निसार खान,झाकीर शेख,सै मुजाहिद, आरिफ मौलाना,अ एजाज,सलीम प्यारेवाले,उमेश शितोळे,कादर अहेमद खान,रशीद निन्सूरवाले,अमीर खान पठाण,आमिर खान,फिरोज प्यारेवाले,प्रदीप वानखडे,मनीष भेलांडे,हाफिज राज,आकीब जावेद,प्रवीण ईश्वरकर,अन्सार खा,तौसिफ खान,फैजल खान,अमीर खान पठाण,मुन्ना खान,रशीद खान,महम्मद मुन्नीवाले,रेहान अली तथा तालुका व शहर काँग्रेसचे आजी माजी व सर्व सेल चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह कारंजा काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष हामीद शेख आदी उपस्थित होते