जिल्ह्यात आज वाढले १३ रुग्ण तर १५ रुग्ण झालेत कोरोनामुक्त

जिल्ह्यात दिवसभरात वाढले १३ कोरोनाबाधित तर १५ कोरोनामुक्त


कारंजा:(प्रतिनिधी) दि २६


    जिल्ह्या माहिती कार्यालयाच्या प्राप्त माहिती नुसार आज दुपारी ८६ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी ८२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आहेत. ४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह असून यामध्ये वाशिम शहरातील बेलदारपुरा येथील १, गिरोली (ता. मानोरा) येथील १, मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील १ व नांदगाव येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.


सायं. ६.३० वा.च्या अहवालात आज रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये मंगरुळपीर तालुक्यातील शेलगाव येथील शिंदे कॉलनी परिसरातील १, आसेगाव येथील १, मांगवाडी (ता. रिसोड) येथील १, वाशिम शहरातील सोफिया नगर येथील १, कारंजा लाड शहरातील अशोक नगर परिसरातील ३ व शिंदे नगर परिसरातील २ अशा एकूण ९ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच १५ रुग्ण् सुुद्धा 


 


कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे 


     वाशिम शहरातील फकीरपुरा येथील १, रिसोड शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील ३, गजानन नगर परिसरातील ३, मांगवाडी येथील १, वनोजा (ता. रिसोड) येथील १, पांगरी कुटे (ता. मालेगाव) येथील १, कारंजा लाड शहरातील आदर्श कॉलनी १, सहारा कॉलनी १, इंदिरा नगर १, शिक्षक कॉलनी १, पोलीस कॉलनी परिसरातील १ व्यक्तीला आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.


 


    सद्यस्थिती


 


एकूण पॉझिटिव्ह – ५३१


ऍक्टिव्ह – २२७


डिस्चार्ज – २९५


मृत्यू – ९


(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)