वाशिम जिल्ह्यात आज दिवसभरात आढळले २५ कोरोना बाधित तर ३६ रुग्ण झाले कोरोनामुक्त
कारंजा:(कारंजा वृत्तकेसरी)दि २०
जिल्ह्या माहिती कार्यालयांच्या प्राप्त माहिती नुसार दुपारी १ वाजुन ३० मि आलेल्या अहवाला प्रमाणे काल रात्री उशिरा ३६ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी २८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह असून, ८ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. सदर व्यक्ती यापूर्वीच्या बाधिताच्या संपर्कातील आहे.
या मध्ये रिसोड शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरातील १, शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील १, इलखी (ता. वाशिम) येथील २, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील १ व अशोक नगर परिसरातील १, मंगरूळपीर शहरातील काझीपुरा येथील १ व पठाणपुरा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या ३६
रुग्ण बरे झाले असून कोरोना मुक्त झाल्याने
त्यांना रुग्णालयातून सूटी देण्यात आली आहे
यामध्ये मालेगाव शहरातील ४, मंगरूळपीर शहरातील ११, कारंजा लाड येथील १० व हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील ११ व्यक्तींचा समावेश आहे.
सायं. ७. ०० वा. अहवालात आढळले आणखी १७ व्यक्ती कोरोना बाधित
आज रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये जिल्ह्यात १७ व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या आहेत. यामध्ये मांगवाडी, रिसोड येथील १०, मंगरूळपीर शहरातील बढाईपुरा परिसरातील ३, आसेगाव (ता. मंगरूळपीर) येथील १, कारंजा लाड शहरातील दिल्ली वेस परिसरातील १ व नगरपरिषद परिसरातील १ आणि वाशिम शहरातील ध्रुव चौक परिसरातील १ व्यक्तीचा समावेश आहे. सर्वजण यापूर्वीच्या बाधितांच्या संपर्कातील आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणारी रुग्ण संख्या पाहता कारंजातील वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा खलबते सुरु झाली असल्याचे दिसत आहे कोरोना चे वाढते प्रमाण पाहता कारंजातील वैद्यकीय क्षेत्र ने सुद्धा नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे