जिल्हाभरात आज सकाळ संध्याकाळ च्या अहवालात आढळले ५० कोरोना बाधीत तर २९ झाले कोरोनामुक्त
कारंजा: (कारंजा वृत्तकेसरी) दि २४
जिल्ह्या माहिती कार्यालय कडून प्राप्त माहिती नुसार आज सकाळ संध्याकाळ च्या चाचणी अहवालात तब्बल ५० कोरोना बाधित आढळले तर २९ रुग्ण कोरोनामुक्त सुद्धा झाले आहेत
काल रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार कारंजा शहरातील इंगोले प्लॉट परिसरातील ५ व्यक्ती, शिक्षक कॉलनी परिसरातील १ व्यक्ती, आसेगाव (ता. मंगरूळपीर) येथील १ व्यक्ती, नांदगाव (ता. मंगरूळपीर) येथील १ व्यक्ती, शेलूबाजार (ता. मंगरूळपीर) येथील १ व्यक्ती आणि वाशिम शहरातील विनायक नगर परिसरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
सायं. ६.३० वाजताच्या अहवाल नुसार वाशिम तालुक्यातील २३, मंगरूळपीर तालुक्यातील ३, रिसोड तालुक्यातील १३ आणि कारंजा लाड शहरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
वाशिम शहरातील हकीम अली नगर परिसरातील २, गंगू प्लॉट परिसरातील ५, सोफी नगर परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील १, जानकी नगर येथील ४, लाखाळा येथील ३ आणि सिंधी कॉलनी परिसरातील १ व्यक्ती तसेच कळंबा महाली येथील ६ व्यक्ती कोरोना बाधित आहेत.
मंगरूळपीर तालुक्यातील शिवणी येथील १, नांदगाव येथील १, वनोजा येथील १ असे अशा एकूण ३ व्यक्ती कोरोना बाधित आहेत. रिसोड तालुक्यातील एकूण १३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये रिसोड शहरातील पठाणपुरा परिसरातील १, आसन गल्ली परिसरातील १ आणि मांगवाडी येथील ११ व्यक्तींचा समावेश आहे. तसेच कारंजा लाड शहरातील इंगोले प्लॉट येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
आज दिवसभरात २९ जण झालेत कोरोनामुक्त
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २८ आणि जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या १ अशा एकूण २९ व्यक्तींना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये मंगरूळपीर शहरातील मंगलधाम परिसरातील ०३, संभाजी नगर परिसरातील ०२, गवळीपुरा परिसरातील ०२, पंचशील नगर परिसरातील ०१, चिखली (ता. मंगरूळपीर) येथील ०६ व्यक्ती, वाशिम शहरातील गोटे कॉलेज परिसरातील ०२ व्यक्ती, रिसोड शहरातील इंदिरा नगर परिसरातील ०७, गजानन नगर परिसरातील ०१ व सिव्हील लाईन्स परिसरातील ०१, मांगवाडी येथील ०१, वनोजा (ता. रिसोड) येथील ०२ व्यक्तींचा आणि अकोला येथे उपचार घेणाऱ्या वाशिम येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.
तसेच कारंजा तालुक्यात ६ जून २० पासुन २३ जुलै संध्याकाळ पर्यन्त शाहरासह तालुक्यात एकूण ४२ प्रतिबंधीत क्षेत्र कोरोना रुग्णा मुळे निर्मित करण्यात आले होते सद्यस्थित कामरगाव येथे ३ ठिकानी ,वालई,शिवनगर, उम्बरड़ा बाजार,रामनगर, येथे तर कारंजा शहरात सिंधी कैम्प,गायत्री नगर,काजी प्लाट,सहारा कॉलोनी,सुदर्शन कॉलोनी,आदर्श कॉलोनी,संभाजी नगर,तुलसी विहार,गवलीपुरा, जिजामाता चौक,आनंद नगर,साई नगर,दिल्ली वेश परिसर, नगर पालिका समोरा,इंगोले प्लाट,शांती नगर,व पुंजानी काम्प्लेक्स मधील बचत बाजार ही क्षेत्रे प्रतिबधित म्हणून घोषित केलेली आहे
सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ४८८
ऍक्टिव्ह – २०३
डिस्चार्ज – २७६
मृत्यू – ९
(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)