प्रशासनाच्या निर्णया अभावी पानटपरी धारक आले आर्थिक अडचणीत? आर्थिक मदत करा किवा व्यवसाय सुरु करण्याची परवानगी दया: पानपट्टी व्यावसाईक संघटना

प्रशासनाच्या निर्णया अभावी पानटपरी धारक आले आर्थिक अडचणीत? आर्थिक मदत करा किवा व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्या


   पानपट्टी व्यावसायिक संघटना


 


कारंजा: (प्रतिनिधी) दी 5 


      कोरोना साथ रोग आजार च्या संकट काळात पूर्ण देशभरात मागील 4 महीने पासुन लोकडौन घोषित केलेला आहे यामुळे सरकार सह सर्वच लहानमोठे व्यावसाईक आर्थिक अडचणीत आले आहेत परिणामतः सरकारने सुद्धा काही प्रमाणात व्यावसाईका संदर्भात विविध आर्थिक सवलती जाहीर केल्या आहेत


    सरकारने आता देशभरात अनलॉक प्रक्रिये चा दूसरा टप्पा सुरु केला आहे यामध्ये अनेक लहान मोठे होटल ,चाहापाना, सलून ची दुकाने पर्यंत दुकानाना आपला व्यवसाय सुरु करण्यास काही अटी नुसार परवानगी दिली आहे परन्तु या सर्वांन मध्ये उपेक्षित राहले ते पानपट्टी व्यावसाईक , ज्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या लहानश्या पान पट्टी च्या व्यावसायावर चालतो तो व्यावसाय आजही प्रशासनाने बंद ठेवन्याचे आदेश कायम ठेवून पाणपट्टी धारकावर उपासमारी ची वेळ आणली आहे


      म्हणून पाणपट्टी धारकानी प्रशासनाला ला आर्थिक मदतीची मागणी करीत आपला व्यावसाय सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे.



  •           याबाबत कारंजा वृत्तकेसरी ने जिल्हाधिकारी श्री ऋषिकेशजी मोडक यांचेशी संपर्क साधला असता पाणपट्टी व्यावसाया बाबत लवकरच योग्य तो घेणार असल्याचे स्पस्ट केले