संत गाडगेबाबा विचार मंच बहुउद्देशीय संस्थेचा वृक्षारोपण चा स्तुत्य उपक्रम
कारंजा:(संदीप क़ुर्हे)
निसर्गाचं रक्षण करणे हे मानवाचे केवळ कर्तव्य नाही तर धर्म आहे. हीच प्रेरणा घेत संत गाडगेबाबा विचारमंच बहुउद्देशीयच्या वतीने दि. ५ जुलै रोजी गुरुपोर्णीमेच्या शुभमुहुर्तावर वृक्षारोपण करण्यात आले. शहरातील संत टेकडी, धुंडा भगत ऋषितलाव परिसरात वृक्षारोपनाचा हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विचारमंचचे सर्व पदाधिकारी ऊपस्थितीत होते.
निसर्ग मानवाला खुप काही देत असतो, त्यामुळे आपण निसर्गाचे ऋणी आहोत ही बाबा लक्षात घेऊन आपण कायम निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. आजच्या आधुनिक जगात मानव मोठ्याप्रमाणात निसर्गाचा र्हास करतो आहे. परिणामी अनेक नैसर्गीक आपत्तीना आपल्याला कायमचवसामोरे जावे लागते. मानव स्वार्थासाठी या निसर्गांची प्रचंड हाणी करतो आहे.
शहरातील सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असणारे तसेच समाजप्रती संवेदनशील असणार्या संत गाडगेबाबा विचारमंच बहुउद्देशीय संस्था यांनी निसर्गाप्रती संवेदनशीलता दाखवत हा ऊपक्रम राबवण्याचे ठरविले होते. या कार्यक्रमात उपस्थिती म्हणून संस्थेचे अध्यक्ष संतोष धोंगडे , सचिव रोहित देशमुख , उपाध्यक्ष राजेश चंदन, सदस्य भारत हांडगे , प्रवीण तुपोने , राहुल देशमुख , सचिन कोळसकर , संदीप काळे , महेंद्र जी गुप्ता (पत्रकार), मोहन पंजवणी , वल्लभ जगताप तसेच संस्थेचे मार्गदर्शक तथा आदरणीय श्री संजय जी कडोळे महाराज (जेष्ठ पत्रकार)हे उपस्थिती होते