जिल्ह्यातील सकाळ संध्याकाळ च्या अहवालात आढळले १४ कोरोना बाधित,
दोघाना डिस्चार्ज, तर एकाचा मृत्यू
कारंजा:(कारंजा वृत्तकेसरी) दि१९
आज जिल्हा माहिती कार्यालयाच्या अहवालात दुपारी व सायंकाळी प्राप्त अहवालानुसार आणखी १४ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. दुपारी प्राप्त अहवालानुसार रिसोड शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील ३ व गजानन महाराज मंदिर परिसरातील १, कारंजा लाड शहरातील साई नगर परिसरातील २ आणि वाशिम शहरातील फकीरपुरा परिसरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सायंकाळी उशिरा ७० व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी ६३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आहेत. उर्वरित ७ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह असून ते सर्वजण यापूर्वीच्या बाधितांच्या संपर्कातील आहेत. यामध्ये मंगरुळपीर शहरातील काझीपुरा येथील ३, टेकडीपुरा येथील ३ व पठाणपुरा येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.
अकोला येथे उपचार घेत असलेल्या मालेगाव व मंगरुळपीर येथील व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये ११ जुलै रोजी पॉझिटिव्ह आढळलेल्या मालेगाव येथील महिलेचा उपचारादरम्यान काल, १८ जुलै रोजी सायंकाळी ५ वा. दरम्यान जिल्हा कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. सदर महिलेला न्यूमोनिया होता.
सद्यस्थित
एकूण पॉझिटिव्ह – ३६६
ऍक्टिव्ह – १९८
डिस्चार्ज – १५९
मृत्यू – ९
(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)
तर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात एकूण रैपिड टेस्ट ४७ तर एकूण स्वैब १५३ घेण्यात आले आहेत तर ३३ रुग्णावर उपचार सुरु असून २ आयसोलेशनमध्ये आहेत
(कारंजा उपजिल्हा रुग्नलयाचे वरील आकडेवारी ही १९/७/२० रोजी पर्यंत ची संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ची आहे)