प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रयत्नाने 5% राखीव निधी चे वाटप
कारंजा :(संदीप क़ुर्हे)
कारंजा तालुक्यातील ग्राम येवता (बंदी) येथील अपंगांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या अथक प्रयत्नाने अनेक वर्षांपासून रखडलेला 5% निधी त्या गावातील अपंगांना ग्रामपंचायत मार्फत वितरीत केला गेला या ग्रामपंचायत मध्ये जवळपास 30 अपंग बांधवाना हा निधी देण्यात आला, येवता (बंदी) येथील अपंग बाधवानी रखडीत पडूंन असलेल्या 5 % राखीव निधी बाबत गावातील प्रहार कार्यकर्त्यांनी ही समस्या प्रहार जनशक्ती पक्षाचे कारंजा तालुका अध्यक्ष महेश राऊत यांना सांगितली त्याबाबत महेश राऊत यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला , त्या बद्दल ग्रामस्थांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे आभार मानले,