आज दिवसभरात २१कोरोना बाधीत तर १३ कोरोनामुक्त
कारंजा: ( कारंजा वृत्तकेसरी) दि २१
जिल्हामाहिती कार्यालय कडून प्राप्त माहिती नुसार दुपारी व सायंकाळी प्राप्त अहवालानुसार मांगवाडी (ता. रिसोड) येथील ११, मंगरूळपीर शहरातील माळीपुरा येथील १, कारंजा लाड शहरातील इंगोले प्लॉट येथील १ व नगरपरिषद परिसरातील १, वाल्हई (ता. कारंजा लाड) येथील १, मालेगाव शहरातील भावसार गल्ली परिसरातील २ व गांधीनगर परिसरातील १, इराळा (ता. मालेगाव) येथील १, शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील १ ,साईलीला नगर वाशिम येथील व्यक्ति कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
वाशिम शहरातील गुप्ता ले-आऊट, हिंगोली नाका परिसरातील १ व्यक्ती अकोला येथे कोरोना बाधित आढळून आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या १३ व्यक्तींना
कोरोनामुक्त मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये वाशिम शहरातील गंगू प्लॉट येथील ४, कसाबपुरा येथील १, हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील ४, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १ व कामरगाव (ता. कारंजा लाड) येथील ३ व्यक्तींचा समावेश आहे.