कारंजात कोरोनाची दहशत कायम आज आढळले 4 बाधीत
कारंजा (कारंजा वृत्तकेसरी) दि.१० -
कोरोनामुक्त झालेल्या कारंजात पुन्हा कोरोनाने आपली दहशत कायम ठेवत शहरातील विविध भागात 4 रुग्णाचा चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.
यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आनंद नगर मधील व्यक्तीचे संपर्कातील २ व्यक्तींचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह म्हणून आला आहे. तर सिंधी कॅम्प मधील एक 45 वर्षीय युवकाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आहे.
तर अमरावती येथे कारंजातील काजी पूरा परिसरातील एका व्यक्तीचा अहवाल पोझेटिव्ह आला आहे
सर्व रुग्ण हे आनंद नगर,काजी पूरा,सिंधी कैम्प परिसरातील असून ह्यांना लागण कशी झाली व यांचे संपर्कात कोण-कोण आले होते त्याचा मागोवा प्रशासन घेत आहे. हा सर्व परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून बंद करण्यात आहे पुढील कार्यवाही प्रशासन करीत असल्याची माहिती कारंजाचे तहसिलदार नोडल अधिकारी धिरज मांजरे यांनी दिली आहे.