कारंजेकरासह प्रशासनाची चिंता वाढली ! कारंजा शहरात निघाले दुपारी 4 तर रात्री च्या रैपिड एन्टी टेस्ट अहवालात 5 रुग्ण कोरोना बाधीत

कारंजेकरासह प्रशासनाची चिंता वाढली !


    कारंजा शहरात निघाले दुपारी 4 तर रात्री च्या अहवालात 5 रुग्ण कोरोना बाधीत


 


कारंजा (कारंजा वृत्तकेसरी) दि 10


     कोरोनामुक्त झालेल्या कारंजात पुन्हा कोरोनाने आपली दहशत कायम ठेवत शहरातील विविध भागात आज दुपारच्या अहवालात 4 रुग्णाचा चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. 


     यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आनंद नगर मधील व्यक्तीचे संपर्कातील २ व्यक्तींचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह म्हणून आला आहे. तर सिंधी कॅम्प मधील एक 45 वर्षीय युवकाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आहे. 


     तर अमरावती येथे कारंजातील काजी पूरा परिसरातील एका व्यक्तीचा अहवाल पोझेटिव्ह आला आहे 


सर्व रुग्ण हे आनंद नगर,काजी पूरा,सिंधी कैम्प परिसरातील असून या पुढील कार्यवाही मध्ये आरोग्य प्रशासनाने वरील रुग्णाचे संपर्कातील काहीना प्रशासनाने तुळजाभवानी मंगल कार्यालय कोरांटाइन सेंटर मध्ये ध्कोरांटाइन केले आहे जिल्ह्या प्रशासना च्या अदेशा नुसार कारंजात सुद्धा रॅपीड अँटीजन टेस्ट ची सुरुवात आजपासून करण्यात आली आहे या मुळे आता तात्काळ कोरोना बाबतीचे निदान लागणार आहे. तसेच यामुळे टेस्टींगही हे मोठ्या प्रमाणावर शक्य होणार आहे. प्रारंभीक स्तरावर क्वारंटाईन सेंटर व जेथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्या भागात टेस्टींग केली जाणार आहे. 


    रॅपीड अँटीजन टेस्ट ची कारंजातील तुळजाभवानी कोरांटाइन सेंटर मध्ये सुरुवात केली असून परिणामी या मध्ये सिंधी कैम्प मधील रुग्ण संपर्कातील 2 महिला 1 मुलगा तर आनंद नगर मधील 1 महिला, तर काजी पूरा मधील 1 व्यक्तिचा रॅपीड अँटीजन टेस्ट


अहवाल पोझेटीव आला आहे परिणामी आता कारंजात दुपारी 4 व आता रात्रि 8 च्या अहवालात 5 असे 9 रुग्ण बधित झालेत पैकी 1 अमरावती येथे उपचार घेत आहे बाकी कारंजा आहे