जिल्ह्यात सकाळ संध्याकाळ च्या अहवालात १९ बाधीत तर १६ रुग्णाना कोरोनामुक्त

आज १९ रुग्णाची वाढ तर १६ रुग्णाना डिस्चार्ज


 


कारंजा:(संदीप क़ुर्हे) दि ३०


  जिल्ह्या माहिती कार्यालय कडून प्राप्त माहिती नुसार जिल्ह्यात आणखी १९ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. यामध्ये  सकाळ च्या अहवालात मानोरा शहरातील रहिमानिया कॉलनी परिसरातील २, तहसील कार्यालयानजीकच्या परिसरातील १, विळेगाव (ता. मानोरा) येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील चिखली येथील ३, वाशिम शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील २, विनायक नगर परिसरातील १ आणि कळंबा महाली येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.


    जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १६ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये रिसोड तालुक्यातील १०, वाशिम शहरातील ध्रुव चौक येथील १ व साईलीला नगर येथील १, मंगरूळपीर शहरातील बढाईपुरा परिसरातील २ व आसेगाव (ता. मंगरूळपीर) येथील १ आणि कारंजा लाड शहरातील नगरपालिका परिसरातील १ व्यक्तीचा समावेश आहे.


संध्याकाळी आलेल्या अहवालात आणखी ८ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. यामध्ये मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील १, इराळा येथील ३ व कारंजा लाड शहरातील पोलीस स्टेशन परिसरातील १ व मंगरूळपीर शहरातील टेकडीपुरा परिसरातील १ व लाठी (ता. मंगरूळपीर) येथील २ व्यक्तींचा समावेश आहे.


      दरम्यान, अकोला येथे उपचार घेत असलेल्या कारंजा लाड शहरातील एका व्यक्तीचा आज मृत्यू झाला आहे.