जिल्ह्यात कोरोना चा थैमान थांबता थांबेना
आज दुपारी दीड वाजता आलेल्या अहवालात
जिल्ह्यात १२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह; तर एका महिलेला डिस्चार्ज
वाशिम : (जी मा का) दि १५
जिल्ह्यातील कोरोनाचे वाढते प्रमाण रोखने करीता जिल्ह्या प्रशासन खबरदारी म्हणून वेळोवेळी योग्य ती पावले उचलत असतानाच कोरोना थाबता थांबेना दिसत आहे जिथे प्रशासनाने टोटल 7 दिवस कड़क लॉकडॉऊन घोषित केला आहे तेथेच कोरोना चा हॉटस्पॉट होत असल्याचे जाणवत आहे
काल रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार रिसोड तालुक्यातील १२ व्यक्तींचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये रिसोड शहरातील इंदिरा नगर परिसरातील ०७, गजानन नगर परिसरातील ०१ व सिव्हील लाईन्स परिसरातील ०१, मांगवाडी येथील ०१ आणि वनोजा (ता. रिसोड) येथील ०२ व्यक्तींचा समावेश आहे. दरम्यान, भापूर (ता. रिसोड) येथील एका महिलेला उपचारानंतर आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
जिल्ह्याबाहेर ४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह; २ व्यक्तींना डिस्चार्ज
वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या व उपचारासाठी जिल्ह्याबाहेरील रुग्णालयात दाखल असलेल्या ०४ व्यक्तींचे अहवाल १३ जुलै रोजी पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये मंगरूळपीर शहरातील दिवाणपुरा परिसरातील ०१ आणि उंबर्डाबाजार (ता. कारंजा लाड) येथील प्रत्येकी व्यक्तीचा समावेश असून हे दोघेही वर्धा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत आहेत. तसेच अकोला व नाशिक येथे उपचार घेणाऱ्या वाशिम शहरातील दोन व्यक्तींचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, पुणे व औरंगाबाद येथे उपचार घेत असलेल्या प्रत्येकी एका व्यक्तीला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
१५ जुलाई च्या संध्याकाळ च्या अहवालात आढळले
३ व्यक्ती कोरोना बाधित
आज दुपारी ३५ अहवाल प्राप्त झाले असून यापैकी ३२ व्यक्तींचे कोरोना विषयक अहवाल निगेटिव्ह आहेत. तर ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये मंगरूळपीर शहरातील १ व कारंजा लाड शहरातील १ तर १ तालुक्यातील शिवनगर मधील व्यक्तींचा समावेश आहे.
कारंजा लाड शहरातील गायत्री नगर परिसरातील ०१ आणि शिवनगर (ता. कारंजा लाड) येथील ०१ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. यापैकी एकजण पुणे येथून परतला आहे, तर एका व्यक्तीला ‘सारी’ची लक्षणे असल्याने त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
मंगरूळपीर शहरातील पठाणपुरा परिसरातील एका व्यक्तीचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला असून सदर व्यक्ती यापूर्वीच्या बाधिताच्या संपर्कातील आहे.