सराफा व्यापारी असोसिएशन तर्फे कोव्हीड योद्धाना आर्सेनिक अल्बम 30 चे वाटप

सराफा व्यापारी असोशिएसन तर्फे कोव्हीड योध्दाना आर्सेनिक अल्बम 30 चे वाटप


कारंजा: ( कारंजा वृत्तकेसरी)


      कोरोना सारख्या महामारीत जिथे संपूर्ण शासन प्रशासन लोकांसाठी अहोरात्र कार्यरत आहेत तेथे त्यांना सहकार्य करणे , त्यांना सहयोग देणे, त्यांच्या कार्याला आपणही थोडा हातभार लावणे आपले कर्तव्य आहेत. यासाठी अनेक सामाजिक संघटना  शिवाय अनेक मदतीचे हात पुढे आले आहेत  तर कुणी सखुशीने पुढे येत आहेत. पण याचसाठी कारंजातील व्यापारी संघटना सुद्धा मागे नाहीत. लॉक डाउन मध्ये जरी सर्वच व्यापारी हतबल झालेत, तरी आपणही या समाजाचं देणं लागतो. या अहोरात्र कार्य करणाऱ्या कोविड योधांचे आपण ऋणी आहोत. ही भावना जोपासत शहरातील व्यापारी असोसिएशन नियमितपणे आपले योगदान देत आहेत. या मध्ये  अग्रस्थानी कारंजातील सराफा व्यापारी अससोसिएशन व स्वर्गीय पुंडलीकराव क-हे फाउंडेशन आपले अमूल्य सहकार्य जनतेला तसेच कोविड योध्याना न चुकता करीत आहेत.त्यांनी आज पर्यंत संघटनेकडून अनेक समाजसेवी उपक्रम राबविले आहेत.


       कारंजा सराफा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री आकाशजी कर्हे यांच्या नेतृत्वात त्यांनी सर्व कोविड योद्धे तसेच गरीब जनतेला , होमिओपॅथिक औषध आर्सेनिक अल्बम चे 5000 बॉटल्सचे वितरण तहसील कार्यालयात केले.      यावेळी कारंजाचे उपविभागीय अधिकारी राहुलजी जाधव, कारंजा तहसीलचे तहसीलदार मा धीरज मांजरे सर  कारंजा शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार मा सतिशजी पाटील ,तसेच नगरपालिका मुख्याधिकारी डोलारकर साहेब, डॉक्टर प्रवीण पेंटे,तसेच कारंजा सराफा चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.