आज दिवसभरात जील्ह्यात आढळले 22 कोरोना बाधीत
एकूण पॉझिटिव्ह – २४५
उपचार घेत असलेले (ऍक्टिव्ह) – १३४
बरे झालेले (डिस्चार्ज) – १०५
मृत्यू – ०६
(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेत असलेल्या कोरोना बाधितांची आहे.)
कारंजा: (कारंजा वृत्तकेसरी) दि 12
आज दुपारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २२ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये रिसोड तालुक्यातील १४, मंगरूळपीर तालुक्यातील ६, कारंजा लाड व वाशिम तालुक्यातील प्रत्येकी १ व्यक्तीचा समावेश आहे.
रिसोड येथील इंदिरा नगर परिसरातील १२ व्यक्ती, सदाशिव नगर परिसरातील ०१, आंचळ (ता. रिसोड) येथील ०१ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. मंगरूळपीर येथील मंगलधाम परिसरातील ०१, बढाईपुरा परिसरातील ०१, दर्गा चौक परिसर ०१, हुडको कॉलनी परिसरातील ०१ व्यक्ती तसेच चिखली (ता. मंगरूळपीर) येथील ०२ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. हे सर्वजण जिल्ह्यातील यापूर्वीच्या बाधितांच्या संपर्कातील आहेत.
कारंजा तालुक्यातील रामनगर येथील ०१ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले असून सदर व्यक्ती यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना बाधिताच्या संपर्कातील आहे. वाशिम शहरातील बागवानपुरा परिसरातील ०१ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले असून सदर व्यक्तीला ‘सारी’ची लक्षणे असल्याने त्याच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
दरम्यान, ७ जुलै रोजी #कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या वाशिम शहरातील कुंभारपुरा येथील ६९ वर्षीय व्यक्तीचा ११ जुलै रोजी एमजीएम, औरंगाबाद येथे मृत्यू झाला आहे. सदर व्यक्तीला हृदयरोग असल्याने त्याची यापूर्वीच शस्त्रक्रिया होवून ‘पेसमेकर’ उपकरण बसविण्यात आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर हृदयरोगविषयक उपचार करणाऱ्या औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान ११ जुलै रोजी सदर व्यक्तीचा मृत्यू झाला.