वाशिम जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरुच
जिल्ह्यात आणखी १६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह
कारंजा: ( कारंजा वृत्तकेसरी) दि 14
जिल्ह्यातील कोरोनाचे वाढते प्रमाण रोखने करीता जिल्ह्या प्रशासन खबरदारी म्हणून वेळोवेळी योग्य ती पावले उचलत असतानाच कोरोना थाबता थांबेना दिसत आहे जिथे प्रशासनाने टोटल 7 दिवस कड़क लॉकडॉऊन घोषित केला आहे तेथेच कोरोना चा हॉटस्पॉट होत असल्याचे जाणवत आहे
आज दुपारी प्राप्त अहवालानुसार मंगरूळपीर तालुक्यातील १४ व वाशिम शहरातील ०२ व्यक्तींचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मंगरूळपीर शहरातील मंगलधाम परिसरातील ०३, संभाजी नगर परिसरातील ०२, गवळीपुरा परिसरातील ०२, पंचशील नगर परिसरातील ०१, चिखली (ता. मंगरूळपीर) येथील ०६ व्यक्ती तसेच वाशिम शहरातील गोटे कॉलेज परिसरातील ०२ व्यक्तींचे कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्वजण यापूर्वीच्या कोरोना बाधितांच्या संपर्कातील आहेत.