जिल्ह्यात ४ बाधीत तर१२ कोरोनामुक्त
कारंजात सुरु आहेत २६ रुग्णावर उपचार तर आजचे ३८स्वैब चे चाचणी अहवालाची प्रतिक्षा
कारंजा: ( कारंजा वृत्तकेसरी)
जिल्ह्या माहिती कार्यालयाच्या सायंकाळीन प्राप्त माहिती नुसार जिल्ह्यात वाशिम येथील सिव्हील लाईन्स परिसरातील ३० वर्षीय पुरुष आणि राहुल पार्क, सोमठाणा (ता. मानोरा) येथील ३३ वर्षीय पुरुष कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. वाशिम जिल्ह्यातील आणखी २ व्यक्ती अकोला येथे कोरोना बाधित आढळून आल्या आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १२ व्यक्तींना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये कारंजा तालुक्यातील ३, मालेगाव तालुक्यातील ३ आणि वाशिम तालुक्यातील ६ व्यक्तींचा समावेश आहे.
दरम्यान अधिकृत प्राप्त माहिती नुसार कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात आज रोजी (२३ जुलै २०) पर्यंत एकूण २५ कोरोना बाधितावर उपचार सुरु असून १ तुळजा भवानी मधील फीवर क्लिनिक मध्ये उपचार सुरु आहेत तर तुळजा भवानी सेंटर व मदरशा सेंटर मध्ये (दोन्ही मिळून ) ३८ लोकांचे स्वैब आज तपासणी साठी पाठवले आहे परिणामी चाचणी अहवाल प्रतिक्षेत असल्याने एकूण ३८ लोकांना कोरंटाईन केली असल्याची माहिती आहे (कारटाइन ची माहिती ही दि २३ जुलै रात्री ८ वाजे पर्यंतची आहे)