दिवसभर दिलासा अन संध्याकाळी धक्का
दुपारच्या चाचणी अहवालात 22 निगेटिव्ह तर संध्याकाळी आलेल्या अहवालात आढळले 7 पोझेटिव्ह रुग्ण
कारंजा :(कारंजा वृत्तकेसरी ग्रुप) दि 20
आज दिवसभरात कोरोना ने आपल्या अहवालात नवीन रुग्ण न देता 22 रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांसाठी दिलसादायक बातमी ठरली असताना संध्याकाळी मात्र एकूण 7रुग्णाचा चाचणी अहवाल हा पोझेटिव्ह आल्याचे पाहुन जिल्हावासियांसाठी चिंतेची बाब ठरत असल्याचे दिसत आहे
आज सायंकाळी जिल्ह्यातील ०७ व्यक्तींचे कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये रिसोड तालुक्यातील ०१, वाशिम तालुक्यातील ०४ व कारंजा लाड तालुक्यातील ०२ व्यक्तींचा समावेश असून हे सर्वजण यापूर्वीच्या कोरोना बाधितांच्या संपर्कातील आहेत.
आसेगाव पेन (ता. रिसोड) येथील २९ वर्षीय महिला, तामसी (ता. वाशिम) येथील एकाच कुटुंबातील ३५ वर्षीय पुरुष, ३० वर्षीय महिला, १५ वर्षीय मुलगा व २ वर्षीय बलिकेला कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. या पाचही व्यक्ती आसेगाव पेन येथील कोरोना बाधित वृद्धेच्या संपर्कातील आहेत.
भीम नगर, कारंजा लाड येथील ५६ वर्षीय पुरुष व ४० वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. ते अकोला येथे मृत्यू पावलेल्या कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील आहेत.