कारंजात मास्क न वापरून ,सामाजीक अंतर न पाळणाऱ्या नागरीकांचा बेजवाबदारपना
मास्क न वापरणाऱ्या बेजवाबदार नागरीकांवर कारंजा पोलिसांची दंडात्मक कारवाई
कारंजा (रामदास मिसाळ)दि ९
जिल्ह्यात पुणे मुंबई वरुन गावी परतनारयांची संख्या ही वाढतीच असून कोरोनाचा संसर्ग चा धोका हा हवे सारख्या घोंगावत असल्याचे चित्र आहे सद्या स्थिती मध्ये कारंजा,मानोरा,व वाशिम तालुक्या ८ वर्षीय बालकासह कोरोनाचे ५ रुग्ण एक्टिव आहेत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिक ' कोणत्याच प्रकारची खबरदारी घेत नसल्याचे दिसून येत आहे . शहरात अनेकांना सामाजिक अंतर व मास्क चे महत्व दिसत नाही , फिजीकल डिस्टन्स चा फज्जा उडत आहे . महसूल प्रशासन,पोलिस प्रशासन,नगर पालिका प्रशासन ज्या पोट टिडकिने कार्य करीत आहेत, प्रशासना च्यावतीने करण्यात येत असले ल्या आवाहनाला ' खो ' देण्याचे प्रकार नागरिकाकड़ून होत असल्याचे दिसत आहे
परिणामी प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे शहरातील दवाखाने , बैंक , तहसील कार्यालय , पंचायत समिती , कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच शहरातील अत्यावश्यक सेवेसह इतर दुकानांवर नेहमीप्रमाणे व्यवसाय सुरळीत झाले आहेत ; परंतु कोरोनाचे संकट जिल्ह्यावर , राज्यावर व देशावर अद्यापही घोंगावत असून , सतर्कता बाळगणे किती महत्वाचे झाले आहे हे नागरिकांना कळत नसल्याचे चित्र आहे
पोलिस प्रशासनाने मात्र मास्क न वापरणाऱ्या वर दंडात्मक कारवाई चा बड़गा उगारल्याने मास्क न वापरणाऱ्यावर वचक निर्माण होत आहे